Mumbai : भयंकर अंत! गॅसचा पाईप तोंडात घेऊन तरुणाची आत्महत्या, दृश्य पाहून पोलिसांनाही बसला धक्का
Last Updated:
Mira-road Shocking News : मिरा रोड येथे राहणाऱ्या करण दीपक कपाडिया या तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
मुंबई : मिरा रोड परिसरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मिरा रोड येथे राहणाऱ्या एका तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. करण दीपक कपाडिया असे मृत तरुणाचे नाव आहे. तो कुटुंबासह मिरा रोड येथील कनकीया परिसरातील एका सोसायटीमध्ये राहत होता.
गॅस पाईपच्या साहाय्याने जीवन संपवले
मिळालेल्या माहितीनुसार, करणने स्वयंपाकाच्या गॅसचा पाइप तोंडात धरून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्याला तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
तरुणाने टोकाचा निर्णय का घेतला?
या घटनेची माहिती मिळताच मिरा रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सध्या आत्महत्येमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. करण कोणत्या मानसिक तणावाखाली होता का याचा तपास पोलीस करत आहेत.
advertisement
पोलिसांकडून तपास सुरू
कुटुंबीयांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असून कोणतीही सुसाईड नोट सापडली आहे का याचीही तपासणी केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शांत स्वभावाचा तरुण म्हणून करणची ओळख होती असे शेजाऱ्यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 7:45 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : भयंकर अंत! गॅसचा पाईप तोंडात घेऊन तरुणाची आत्महत्या, दृश्य पाहून पोलिसांनाही बसला धक्का







