हिरोपेक्षा जास्त फी, एका चुकीनं करिअर उध्दवस्त; बेरोजगार असूनही करोडोची मालकणी आहे ही मराठमोळी अभिनेत्री
- Published by:Minal Gurav
Last Updated:
90 च्या दशकात हिरोपेक्षा अधिक फी घेणारी ही मराठमोळी अभिनेत्री. आज सिनेक्षेत्रापासून दूर आहे. मात्र तरीही कोट्यवधींची मालकीण आहे. ही अभिनेत्री आहे तरी कोण?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
राम गोपाल वर्माच्या 'रंगीला' सिनेमानं उर्मिलाला एका रात्रीत स्टार बनवलं. त्यानंतर ती राम गोपाल वर्माच्या प्रत्येक सिनेमात दिसली. दोघांनी जवळपास 13 सिनेमांमध्ये एकत्र काम केले आहे. त्या वेळी राम गोपाल वर्मा आणि उर्मिला मातोंडकर यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. राम गोपाल वर्मा आधीच विवाहित होते आणि जेव्हा दिग्दर्शकाच्या पत्नीला त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली तेव्हा तिने उर्मिलाला खूप सुनावलं होतं, अशाही चर्चा आहेत.
advertisement
या वादानंतर राम गोपाल वर्मा आणि उर्मिला यांच्यातील संबंध चांगलेच बिघडले. राम गोपाल वर्माचं तेव्हा इंडस्ट्रीमध्ये एक मोठं नाव होतं. त्यामुळे उर्मिला मातोंडकरला कास्ट करून राम गोपाल वर्मा यांना विरोध करण्याचा धोका कोणीही घेऊ इच्छित नव्हता. त्यामुळे उर्मिलाला सिनेमात कास्ट करायला निर्माते, दिग्दर्शक घाबरत होते. काही वर्षांनी उर्मिला इंडस्ट्रीतून गायबच झाली.
advertisement
काही वर्षांपूर्वी उर्मिला मातोंडकरने 2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2019 ची लोकसभा निवडणूक तिने मुंबई उत्तर मतदारसंघातून लढवली होती पण तिचा पराभव झाला होता. त्याच वर्षी तिने अंतर्गत राजकारणाचं कारण देत पक्षाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार उर्मिला मातोंडकर 68 कोटी रुपये कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.






