advertisement

पुणेकरांनो सावधान! WhatsApp वापरताना एक छोटी चूक अन् खात्यातून साडेसात लाख रूपये गायब, काय घडलं?

Last Updated:

एका व्यापाऱ्याचं व्हॉट्सॲप हॅक करून सायबर चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून तब्बल ७ लाख ४१ हजार ६७१ रुपये लंपास केले आहेत

WhatsApp हॅक करून चोरी (AI Image)
WhatsApp हॅक करून चोरी (AI Image)
पिंपरी-चिंचवड: सोशल मीडियाचा वापर करताना थोडासा निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, याचं धक्कादायक उदाहरण भोसरीमध्ये समोर आलं आहे. यात एका व्यापाऱ्याचं व्हॉट्सॲप हॅक करून सायबर चोरट्यांनी त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून तब्बल ७ लाख ४१ हजार ६७१ रुपये लंपास केले आहेत. या घटनेमुळे व्यापारी वर्गात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
परिमल नबकृष्ण परीडा (वय ३२, रा. शांतीनगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. परिमल हे व्यावसायिक असून त्यांचे भोसरी परिसरात दुकान आहे. १ जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अज्ञात सायबर चोरट्याने तांत्रिक कौशल्याचा वापर करून परिमल यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक केले.
बँक खात्यावर डल्ला
व्हॉट्सॲपचा ताबा मिळवल्यानंतर चोरट्याने परीडा यांच्या मोबाईलमधील गोपनीय माहिती आणि बँक तपशील शोधले. परिमल यांच्या पत्नीचे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या भोसरी शाखेत 'करंट अकाऊंट' आहे. हॅकरने या खात्याची माहिती मिळवून अत्यंत शिताफीने ७ लाख ४१ हजार ६७१ रुपये वेगवेगळ्या ट्रान्झॅक्शनद्वारे स्वतःच्या खात्यावर वळवून घेतले. काही वेळातच खात्यातून एवढी मोठी रक्कम गेल्याचा संदेश आल्यावर परीडा कुटुंबियांना धक्का बसला.
advertisement
पोलिसांकडून गुन्हा दाखल
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले. भोसरी पोलिसांनी अज्ञात संशयित आरोपीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार (IT Act) गुन्हा दाखल केला आहे. सायबर सेलच्या मदतीने पोलीस आता ज्या खात्यांवर पैसे वळवण्यात आले आहेत, त्याचा माग काढत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांनो सावधान! WhatsApp वापरताना एक छोटी चूक अन् खात्यातून साडेसात लाख रूपये गायब, काय घडलं?
Next Article
advertisement
GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement