advertisement

IND vs PAK : T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकिस्तानचे नखरे, हेड कोच गंभीरने एका शब्दात विषय संपवला

Last Updated:

Gautam Gambhir on Pakistan Boycott : भारतीय टीमचा हेड कोच गौतम गंभीर मुंबईला रवाना होण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचला असता, मीडियाने त्याला पाकिस्तानच्या वादावर प्रश्न विचारला

Gautam gambhir shocking reaction pakistan boycott
Gautam gambhir shocking reaction pakistan boycott
India Pakistan Match Boycott : पाकिस्तान सरकारने रविवारी अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून माहिती दिली की, पाकिस्तान संघ वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होईल, परंतु 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोमध्ये होणाऱ्या भारताविरुद्धच्या मॅचसाठी मैदानात उतरणार नाही. या धक्कादायक निर्णयामुळे आयसीसी आणि क्रिकेट प्रेमींमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) यावर काय कठोर भूमिका घेतंय, याकडे सर्वांचे लक्ष लागलं असून पाकिस्तानच्या या भूमिकेचा स्पर्धेवर मोठा परिणाम होऊ शकतो.

गंभीरने 'मौन' बाळगणं पसंत केलं

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय टीमचा हेड कोच गौतम गंभीर मुंबईला रवाना होण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचला असता, मीडियाने त्याला पाकिस्तानच्या वादावर प्रश्न विचारला. मात्र, मैदानावर आक्रमक राहणाऱ्या गंभीरने येथे 'मौन' बाळगणं पसंत केलं. रिपोर्टर्सनी त्यांना वारंवार पाकिस्तानच्या बहिष्काराबद्दल विचारलं, पण त्याने कोणताही प्रतिसाद न देता केवळ मीडियाचे आभार मानले आणि तेथून निघून गेले. फक्त थँक्यू म्हणत गंभीरने वाट मोकळी केली. गंभीरची ही शांतता सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
advertisement

पाहा Video

भारताला 2 पॉइंट्स मिळतील

दरम्यान, जर पाकिस्तानने 15 फेब्रुवारीची मॅच खेळण्यास नकार दिला, तर भारताला नियमानुसार 2 पॉइंट्स सहज मिळतील, पण कोट्यवधी फॅन्स या ऐतिहासिक लढतीला मुकणार आहेत. आता आयसीसी या प्रकरणात मध्यस्थी करून काही तोडगा काढते की पाकिस्तान आपल्या निर्णयावर ठाम राहतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
advertisement
India squad for the ICC T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : T20 वर्ल्ड कपच्या तोंडावर पाकिस्तानचे नखरे, हेड कोच गंभीरने एका शब्दात विषय संपवला
Next Article
advertisement
GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement