ॲन्टी-एजिंग औषधांमध्ये रेटिनॉइड्स, हार्मोनल थेरपी आणि सप्लिमेंट्स यांचा समावेश होतो. यापैकी काही औषधे त्वचेची संवेदनशीलता वाढवू शकतात, ज्यामुळे लालसरपणा, खाज किंवा त्वचेचा कोरडेपणा यासारख्या समस्या उद्भवतात. हार्मोनल उपचारांचा अतिवापर शरीरातील संप्रेरकांचे संतुलन बिघडवू शकतो, ज्यामुळे वजन वाढणे, थकवा किंवा गंभीर आजारांचा धोका वाढतो. काही सप्लिमेंट्स यकृतावर ताण टाकू शकतात किंवा औषधांशी संघात घडवू शकतात. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय यांचा वापर धोकादायक ठरू शकतो, असं अमृता कुलकर्णी यांनी सांगितलं.
advertisement
तरुण राहण्यासाठी जीवनशैलीतील बदल
निरोगी जीवनशैली ॲन्टी-एजिंगचा सर्वात प्रभावी आणि सुरक्षित मार्ग आहे. नियमित व्यायाम, जसे की योग, चालणे किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग, रक्तप्रवाह सुधारतो आणि त्वचेला तजेला देतो. संतुलित आहारात हिरव्या भाज्या, फळे, नट्स आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड्सचा समावेश करावा. पुरेशी झोप आणि तणावमुक्ती त्वचेच्या वृद्धत्वाला थांबवते. सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण, हायड्रेशन आणि धूम्रपान-मद्यपान टाळणे यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण राहते. ध्यान आणि सकारात्मक मानसिकता यामुळे मानसिक आणि शारीरिक वृद्धत्व मंदावते, असं डॉ. कुलकर्णी यांनी सांगितलं.