डॉ. अविनाश भोंडवे सांगतात की, धरणे, नद्या, तलाव अशा ठिकाणी साचलेले पाणी स्वच्छ नसते. या पाण्यात भिजल्याने त्वचेचे विकार, डोळ्यांचे संसर्ग, श्वसनाचे त्रास, तसेच पचनसंस्थेशी संबंधित समस्याही होऊ शकतात. विशेषतः ज्यांना दम्याचा त्रास आहे किंवा दीर्घकाळ खोकल्याचा त्रास होत असेल, त्यांनी अशा ठिकाणी भिजणे टाळलेले उत्तम. कारण पावसामुळे तापमानात होणारा बदल आणि ओलसर हवामानामुळे हे त्रास अधिक वाढू शकतात.
advertisement
Diet for Diabetes: हे 5 पदार्थ म्हणजे मधुमेहींसाठी विष! तुम्ही खाणं सोडलं का?
जर या ठिकाणी भिजलातच, तर लगेच अंग कोरडे करणे अत्यंत आवश्यक आहे. ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नयेत. त्याचप्रमाणे, अशा ठिकाणी फिरताना मिळणारे खाद्यपदार्थ आणि पाणी हे अनेकदा अशुद्ध असते. त्यामुळे टायफॉइड, कावीळ, उलट्या-जुलाब यांसारख्या पचनसंस्थेशी संबंधित आजारांची शक्यता वाढते.
पावसाळ्यात पाण्याचा आनंद घ्यायचा असला तरी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. भिजल्यानंतर गरम पाण्याने स्नान, कोरडे कपडे, आणि शक्य असल्यास गरम पेये घेणे यामुळे त्रास टाळता येतो. कोणताही त्रास जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे, असं डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.





