कोल्ड्रिफ कफ सिरप दिल्यामुळे मध्यप्रदेशात 18 आणि नागपूर जिल्ह्यात 8 लहान बालकांचा मृत्यू झाला. या कफ सिरपमध्ये असलेल्या धोकादायक रसायनामुळे बालकांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य तज्ञांकडून सांगण्यात आले. 1950 मध्ये या कफ सिरप कोडेनला पर्याय म्हणून वापरण्यात येत होते. मुख्यतः कोरडा खोकला येत असेल तर ह्या औषधाचा वापर करण्यात येतो. जर लहान मुलांना किंवा रुग्णाला लिव्हर संबंधित किंवा किडनी संबंधित आजार असतील, तर हे औषध देण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
Health Tips : सकाळचा 'हा' चहा सोडवतो पचन-बद्धकोष्ठतेच्या समस्या, हृदयासाठीही फायदेशीर..
पालकांनी काय काळजी घ्यावी?
साधा सर्दी खोकला असेल तर कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रुग्णाला देऊ नये. वेगवेगळी औषधे लहान मुलांना किती प्रमाणात द्यावी हे तपासून पाहावे. लहान मुलांच्या वयाप्रमाणे आणि वजनाप्रमाणे डोस द्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलवरून घेतलेली औषधे लहान मुलांना देऊ नयेत.