ऑईली स्कीनसाठी डेली नाईट रूटीन
हिवाळ्यात डेली नाईट स्किन केअर रूटीन कसं असायला हवं? याबाबत माहिती देताना डॉ. टाकरखेडे सांगतात की, हिवाळ्यात त्वचा कोरडी होत असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की, ऑईली त्वचेला मॉइश्चरायजर लावायची गरज नाही. पण, ऑईली आणि पिंपल्स असलेल्या त्वचेला जर तुम्ही मॉइश्चरायझर लावले नाही तर तुमची त्वचा आणखी जास्त कोरडी होत जाते. कोरड्या त्वचेला मग इन्फेक्शन वाढतात. त्यामुळे ऑईली स्कीनवाल्यांनी ऑईल फ्री असणारे मॉइश्चरायजर रात्री चेहरा धुवून वापरावे. उन्हाळ्यात वापरतो ते फेसवॉश टाळायला पाहिजे. जेंटल क्लिंझर वापरायचं आणि चेहरा धुवायचा, असं त्यांनी सांगितलं.
advertisement
अहो खरंच! पुण्यात दिसली चार पायाची कोंबडी, पाहण्यासाठी लागल्या रांगा, Video
पिंपल्स असलेल्या त्वचेचे रूटीन
पुढे त्या सांगतात की, जर तुमच्या त्वचेवर पिंपल्स असतील तर तुम्ही क्लीनडामायसिन आणि नियासिनमाईड असणारे क्रीम रात्रीच्या वेळी लावू शकता. चेहरा धुवून त्यावरच इतर प्रॉडक्ट लावावे. कोरड्या त्वचेसाठी सिरॅमुसाईड असणारे मॉइश्चरायझर येतात ते तुम्ही वापरायला पाहिजे.
तुमची त्वचा जर सुरकुत्या असलेली, निस्तेज अतिशय कोरडी असेल त्यासाठी हायल्युरूनिक ऍसिड असलेले मॉइश्चरायजर येतात, ते वापरू शकता. जेंटल क्लिंजरने चेहरा धुवून मॉइश्चरायजर अप्लाय केले तर तेही हिवाळ्यात पुरेसे असतं. इतर काही घरगुती उपाय करून चेहरा आणखी डॅमेज होऊ शकतो. त्यामुळे जास्त त्रास असल्यास एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या, अशी माहिती त्यांनी दिली.





