छत्रपती संभाजीनगर : हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. हिवाळा म्हटलं की सगळीकडे छान थंडगार असं वातावरण असतं. पण अशातच लहान मुलांचा आहार देखील चांगला असणं गरजेचं आहे. तर या हिवाळ्यामध्ये आपल्या लहान मुलांचा आहार कसा असावा? त्यांच्या आहारामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश असावा? याविषयी आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती सांगितलेली आहे.
advertisement
कसा असावा मुलांचा आहार?
हिवाळ्यामध्ये भूक लागण्याचे प्रमाण हे जास्त असतं. हिवाळ्यामध्ये लहान मुलांच्या आहारामध्ये सर्व गोष्टींचा समावेश करावा. मुलांच्या आहारामध्ये ड्रायफ्रूटचा समावेश असावा. यामध्ये तुम्ही त्यांना बदाम, अक्रोड, पिस्ता, खारीक यांचा समावेश करू शकता. सकाळी मुलांना तुम्ही उठल्यानंतर एक कप दुधामध्ये बारीक खारकेची पावडर मिसळून देणे अत्यंत चांगलं असतं. पण खारकेची पावडर ही घेताना तुम्ही काळ्या खारकेची पावडर घ्यावी. यामध्ये भरपूर असा प्रोटीन असतं. त्यानंतर मुलांच्या आहारामध्ये सर्व भाज्यांचा समावेश करावा आणि सर्व फळांचा देखील आहारामध्ये समावेश असावा.
हिवाळ्यात चेहऱ्यावर ग्लिसरीन लावताय? तर सावधान, बघा तज्ज्ञ काय सांगतात
मुलांना तुम्ही वेगवेगळे पराठे करून देऊ शकता. यामध्ये तुम्ही गाजराचा पराठा, बीटरूटचा पराठा, पालक पराठा, गोबी पराठा असे वेगवेगळे पराठे करून देऊ शकता. आता सध्याला बाजारात मटार देखील यायला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही मटार पराठा करून देखील मुलांना देऊ शकता. हे पराठे करताना त्यामध्ये तुम्ही आवर्जून बडीसोप पावडर आणि धने पावडर पराठ्याच्या मिश्रनामध्ये टाकावी. जेणेकरून चांगली इम्युनिटी आणि चांगली पचन संस्था तिळाचा देखील समावेश करावा.
अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांच्या आहारामध्ये या गोष्टींचा समावेश करू शकता. यामधून त्यांना चांगलं विटामिन देखील भेटतं, असं आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी सांगितलं.





