आनुवंशिकतेमुळे वाढतो धोका
कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रतिक पाटील यांनी सांगितले की, जर एखाद्या कुटुंबात आधी कोणाला कॅन्सर झाला असेल तर त्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही कॅन्सर होण्याचा धोका तुलनेने अधिक असतो. त्यामुळे जेनेटिक म्युटेशन टेस्ट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. ही टेस्ट रक्ताद्वारे केली जाते. यामध्ये कॅन्सर आनुवंशिक आहे की नाही हे स्पष्ट होते. तसेच आपल्या रक्तात कॅन्सरला जन्म देणाऱ्या दोषपूर्ण पेशी आहेत का, हे देखील समजू शकते.
advertisement
Health Tips: लहान मुलांचे सतत दुखतंय पोट, वेळीच करा उपाय, 5 महत्त्वाच्या टिप्स
कॅन्सर होण्याची कारणे
दूषित अन्नपदार्थ, प्रदूषित वातावरण आणि अस्वस्थ जीवनशैली यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. महिलांमध्ये स्तनपान न करणे किंवा गर्भधारणा न ठेवणे ही देखील महत्त्वाची कारणे मानली जातात. त्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर आणि युटेराइन कॅन्सर होण्याचा धोका अधिक वाढतो. याशिवाय तंबाखूचे सेवन, मद्यपान, सततचा ताणतणाव, शारीरिक हालचालींचा अभाव, तसेच असुरक्षित लैंगिक संबंध किंवा एकापेक्षा जास्त लैंगिक साथीदार असणे हे देखील काही प्रकारच्या कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात, असे डॉक्टर सांगतात.
कॅन्सर रोखण्यासाठी जेनेटिक टेस्ट महत्त्वाची
कॅन्सर तज्ज्ञ डॉ. प्रतिक पाटील म्हणाले की, कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी वेळेवर तपासणी करणे गरजेचे आहे. यामध्ये विशेषत: जेनेटिक टेस्ट महत्त्वाची ठरते. ही तपासणी रक्ताद्वारे केली जाते आणि यातून आपल्या शरीरात असे जीन्स आहेत का जे पुढे जाऊन कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात, हे समजू शकते. त्यांनी सांगितले की, कुटुंबात जर एखाद्याला कॅन्सर झाला असेल, तर इतर सदस्यांनी ही टेस्ट नक्की करून घ्यावी.