फळे खाणे हे फायदेशीर असते कारण की त्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आपल्याला मिळत असतात. त्यासोबतच आपण सर्वांनी ताजी आणि सीझनल फळे खाणे गरजेचे आहे. आणि जर तुम्ही सकाळी उठून फळे खाल्ली तर मधुमेह, हृदयरोग आणि कॅन्सर सारख्या आजारांपासून दूर राहता.
advertisement
सकाळी उठल्यानंतर सफरचंद, पपई, डाळिंब, मोसंबी, केळी अशी सर्व प्रकारची फळे खाणे गरजेचे आहे. त्यासोबतच खूप जी आंबट फळे आहेत ज्यामधून अॅसिडिटी होते आणि ज्या लोकांना अॅसिडिटीचा प्रॉब्लेम आहे अशांनी ही फळे खाणे टाळावे. पण ज्यांना अॅसिडिटीचा त्रास होत असेल त्यांनी नाश्त्यानंतर फळे खावीत. सफरचंद, चिकू, पपई ही फळे खाऊ शकतो.
त्यासोबतच ज्या रुग्णांना मधुमेह आहे अशा रुग्णांनी केळी, चिकू, सीताफळ, आंबे अशी फळे खाणे टाळावे कारण की या फळांमध्ये शर्करा मोठी असते आणि यामुळे तुमची शुगर वाढण्याची शक्यता असते त्यामुळे ही फळे खाऊ नयेत. जसे संत्री, मोसंबी, डाळिंब, पेरू अशी फळे खावीत. दिवसाला 100 ग्रॅम एवढी फळे खावीत. पण ही सर्व फळे नाश्त्यानंतर खावीत.
ज्यांना हृदयविकार आहे अशांनी डाळिंब, सफरचंद, किवी ही फळे खावीत. सकाळी खावीत किंवा नाश्ता झाल्यानंतर एक-दोन तासानंतर ही फळे खावीत म्हणजे त्यांचे सर्व नियंत्रणात राहील, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर ही सर्व फळे खाऊ शकता पण खाताना ती नियंत्रणातच खावीत विशेष करून नुसती ताजी फळे खावीत त्या फळांचा ज्यूस करून पिण्यापेक्षा कारण ज्यूसपेक्षा फळे खाणे कधीही आरोग्यासाठी फायदेशीर असते, असंही आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितलं आहे.





