छत्रपती संभाजीनगर : आपल्याकडे रोजच्या आहारात तूर किंवा तुरीच्या डाळीचा वापर केला जातो. शेतकऱ्यांच्या शेतात हिवाळ्यात तुरीच्या शेंगा मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यामुळे या शेंगा बाजारातही दिसतात. आपण सर्वजण आवडीने तुरीच्या शेंगा खात असतो. पण या शेंगा खाण्याचे आरोग्यासाठी भरपूर फायदे आहेत. याबाबतच छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिलीय.
advertisement
काय आहेत आरोग्यासाठी फायदे?
तुरीच्या दाण्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोह असते. हे लोह आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगला असतं. आपल्याला जर खूप थकवा येत असेल तर त्यावरती उपाय म्हणून सुद्धा आपण ओल्या तुरीचे दाणे खाऊ शकतो. तुरीच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्न, फॉस्फरस, कॅल्शियम असते. तसेच तुरीच्या दाण्यांमध्ये ब जीवनसत्व आहे. हे ब जीवनसत्व मेंदूचा हार्मोन सीक्रेट तयार करण्यासाठी मदत करतात व हे आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगलं आहे, असंही कर्णिक सांगतात.
आरोग्यासाठी लाभदायी बीट; घरीच बनवा ‘या’ सोप्या पद्धतीनं लाडू रेसिपी
तुरीचा शेंगामध्ये मॅग्नेशियम हा घटक आहे. हा घटक आपल्या शरीरावरील ताण तणाव कमी करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे तुरीच्या शेंगा आवर्जून खाणे गरजेचे आहे. हे दाणे आपण बॉईल करून खाऊ शकतो. पण ज्यांना हाय बीपीचा आजार आहे त्यांनी बॉईल करून खाऊ नये. त्या ऐवजी तुम्ही याची आमटी करून खा. यातून देखील तुम्हाला भरपूर फायदे भेटतात, असेही कर्णिक यांनी सांगितले.