डॉ. शर्वरी इनामदार यांनी सांगितलं की, हिवाळ्यात शरीराला ऊर्जा आणि रोगप्रतिकारक शक्ती मिळवण्यासाठी तीळ, बदाम, अक्रोड यांपासून बनवलेल्या लाडूंचा आहारात समावेश करणे गरजेचे आहे. तसेच, तूपही नियमितपणे खाल्ले पाहिजे, पण डायबिटीस, उच्च रक्तदाब, संधिवात किंवा थायरॉईड असलेल्या लोकांनी तूप पिष्टमय पदार्थांवर टाकून खाणे टाळावे. हिवाळ्यात प्रोटीनसाठी नॉनव्हेज, अंडी खाणे फायदेशीर ठरते. योग्य आहारासोबत नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. याशिवाय, हिवाळ्यात पुरेशी झोप घेणे आणि भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
advertisement
World Diabetes Day: मधुमेहाच्या रुग्णांसाठी कसा असावा आहार? जाणून घ्या परफेक्ट डाएट प्लॅन
हिवाळ्यात कोणत्या गोष्टी टाळाव्यात?
हिवाळ्यात काही गोष्टी टाळणे देखील गरजेचे आहे. थंड पाणी आणि शीतपेये टाळा, कारण यामुळे पचनशक्तीवर परिणाम होतो. जास्त तेलकट आणि तळलेले पदार्थ कमी खाण्याचा सल्ला डॉ. इनामदार यांनी दिला आहे. याशिवाय, हिवाळ्यात संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते, त्यामुळे हात स्वच्छ ठेवणे आणि अन्न एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी, खाण्याच्या वेळा नियमित ठेवणे गरजेचे आहे.





