World Diabetes Day: मधुमेहाच्या रुग्णांसाठी कसा असावा आहार? जाणून घ्या परफेक्ट डाएट प्लॅन
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
World Diabetes Day: मधुमेह हा जगभरासह भारतात देखील झपाट्याने वाढणारा आजार आहे. विशेष म्हणजे हा कधीही पूर्णपणे बरा न होणारा आजार असल्याने योग्य डायट हाच चांगला उपाय ठरतो.
छत्रपती संभाजीनगर: दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा केला जातो. मधुमेह हा जगभरासह भारतात देखील झपाट्याने वाढणारा आजार आहे. विशेष म्हणजे हा कधीही पूर्णपणे बरा न होणारा आजार असल्याने योग्य डायट हाच चांगला उपाय ठरतो. यामध्ये टाईप 1 आणि टाईप 2 असे दोन प्रकार आहेत. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हाच आहार किंवा डायट कसा असावा? याबाबत छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिलीये.
मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आपला आहार एकदम सकस आणि पौष्टिक ठेवावा. टाईप 1 डायबिटीस असणाऱ्यांनी आहारात भाजीपाला, फळे यांचा समावेश असावा. विशेष म्हणजे प्रथिने आणि कर्बोदके यांचा संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. पालेभाज्या, फळभाज्या, सलाड, कडधान्य हे सर्व आहारात घ्यावे. तसेच दररोज जेवणामध्ये वरण-भात, पोळी-भाजी, एखादी पालेभाजी, कोशिंबीर हे सुद्धा असणं गरजेचे आहे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
advertisement
ज्यांना टाईप टू डायबेटिस आहे अशांनी त्यांचा देखील आहार संतुलित ठेवणं गरजेचं आहे. त्यांच्या उंचीप्रमाणे, त्यांच्या वजनाप्रमाणे आहार व्यवस्थापन करावे. ज्यांना टाईप टू डायबिटीज आहे त्यांनी त्यांच्या गोळ्या औषधांप्रमाणे आहार व्यवस्थापन करावं. प्रथिनयुक्त डाळी, कडधान्ये, तसेच जे नॉनव्हेज खातात त्यांनी अंडी व्यवस्थित प्रमाणामध्ये घ्यावी. आठवड्यामध्ये एक ते दोन वेळा मांसाहार केला तरी चालतो. तसेच कारलं, गवार, मेथी आणि इतर पालेभाज्या आहारात असाव्यात. तंतुमय पदार्थांचा देखील आहारात समावेश करावा.
advertisement
मधुमेहाच्या रुग्णांनी हे खाऊ नये
मधुमेहाच्या रुग्णांनी ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त आहे अशा फळांचा समावेश आहारात करू नये. केळी, सीताफळ, द्राक्षे, चिकू ही फळे खाऊ नयेत. तर संत्री, मोसंबी, सफरचंद, डाळिंब ही फळे खावीत. पण एका वेळी फक्त शंभर ग्रॅम एवढे खावे, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
साखरेऐवजी गूळ खावा का?
काही वेळा आपला समज असतो की, आपल्याला शुगर असल्याने आपण साखर खाऊ शकत नाही. तर गूळ आणि मध खाऊ शकतो. पण तसं नाही. साखरेप्रमाणेच मधुमेहींना गूळ आणि मधाचं सेवन देखील घातक ठरू शकतं. तरीही तुमची गोड खाण्याची इच्छा झालीच तर आठवड्यातून एक किंवा दोन वेळा तुम्ही शुगर फ्री असलेले पदार्थ खाऊ शकता, असेही आहारतज्ज्ञ सांगतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Nov 14, 2025 12:18 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
World Diabetes Day: मधुमेहाच्या रुग्णांसाठी कसा असावा आहार? जाणून घ्या परफेक्ट डाएट प्लॅन









