World Diabetes Day: तुमच्या मुलांत ही लक्षणे तर नाहीत ना? मधुमेहाचा धोका वाढतोय, लगेच घ्या काळजी!
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
World Diabetes Day 2025: मधुमेह कधीही बरा न होणारा आजार असून याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. लहान मुलांना देखील धोका वाढत आहे.
छत्रपती संभाजीनगर : 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून साजरा करतात. मधुमेह कधीही बरा न होणारा आजार असून याकडे दुर्लक्ष केलं तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. सध्या देशासह संपूर्ण जगभरातही या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मोठ्या माणसांसोबतच अनेक लहान मुलांमध्येही या आजाराची लक्षणं दिसून येत आहेत. या आजाराची लक्षणं लहान मुलांमध्ये का दिसून येत आहेत? आणि या आजाराची लक्षणं कशी ओळखावी? याबाबत मधुमेहतज्ज्ञ डॉक्टर मयुरा काळे यांच्याकडून जाणून घेऊ.
टाईप वन डायबिटीस
लहान मुलांमध्ये टाईप वन डायबेटीस हा खूप कॉमन आहे. आजकाल टाईप टू मधुमेह देखील दिसायला लागला आहे. टाईप वन डायबेटीस म्हणजे आपल्या शरीरातील ज्या इन्शुलिन तयार करणाऱ्या पेशी कमी होतात, त्यामुळे हा डायबिटीज होत असतो. यावरती एकच उपचार आहे तो म्हणजेच इन्शुलिन घेणं होय.
advertisement
लक्षणे काय?
शरीरातील इन्सुलिन कमी झाल्यानंतर मुलांना खूप तहान लागते. वारंवार लघवीला जावं लागतं. वारंवार भूक लागते. वजन कमी व्हायला लागतं. अशक्तपणा येतो. काहीवेळा मुले कोमात जाण्याची शक्यता देखील असते, असं डॉक्टर सांगतात.
इन्सुलिन घ्यावंच लागतं...
टाईप वन डायबिटीज असणाऱ्या मुलांना दिवसातून चार वेळा इन्सुलिन घेणे गरजेचे आहे. त्यामुळे शुगर नियंत्रणात राहायला मदत होते. अनेक वेळा आई-वडील विचारतात की आमच्या मुलाचे इन्सुलिन बंद होईल का? पण ते शक्य नाही. कारण इन्सुलिन बंद केलं तर या मुलांच्या आरोग्यावर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मधुमेहावर इन्सुलिन आणि गोळ्या हाच उपाय आहे.
advertisement
टाईप टू डायबिटीस
काही मुले सतत मोबाईल पाहतात, जंक फूड खातात, व्यायाम करत नाहीत, जीवनशैली बैठी असते, अशांना टाईप टू डायबिटीसचा धोका असतो. यासाठी देखील त्या मुलांनी व्यवस्थित आहार घेतला पाहिजे. बाहेरचं खाणं बंद केलं पाहिजे. जंक फूड, फास्टफूड टाळलं पाहिजे. ही सर्व काळजी घेतली तर त्यांचा मधुमेह देखील नियंत्रणात राहतो, असं डॉक्टर सांगतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Nov 14, 2025 10:24 AM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
World Diabetes Day: तुमच्या मुलांत ही लक्षणे तर नाहीत ना? मधुमेहाचा धोका वाढतोय, लगेच घ्या काळजी!








