Diabetes Day 2025 : डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
सध्या डायबिटीज हा आजार भारतामध्ये झपाट्याने वाढत चाललेला आहे. डायबिटीज म्हणजे टाइप वन, टाइप टू असे प्रकार आहेत.
छत्रपती संभाजीनगर : सध्या डायबिटीज हा आजार भारतामध्ये झपाट्याने वाढत चाललेला आहे. डायबिटीज म्हणजे टाइप वन, टाइप टू असे प्रकार आहेत. त्यापैकीच एक म्हणजे डायबिटीज रिव्हर्सल हे देखील आहे. तर हे नेमकं काय आहे? काय केल्याने डायबिटीज कमी होते? याविषयीच आपण मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर मयुरा काळे यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत.
डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे रक्तातील साखरेची पातळी सामान्य करण्याची प्रक्रिया आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीतील बदलांद्वारे हे साध्य केले जाऊ शकते. काही लोकांसाठी, याचा अर्थ औषधे कमी करणे किंवा थांबवणे देखील असू शकते. तथापि, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की डायबिटीज रिव्हर्सल प्रत्येकासाठी शक्य नसू शकते आणि वैयक्तिक परिणाम भिन्न असू शकतात. त्यामुळे आपण आपला आहार व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे म्हणजे ज्यांना टाइप 1 किंवा टाइप 2 डायबिटीज आहे अशांनी देखील.
advertisement
जर तुमची डायबिटीज नियंत्रणात आली तर त्यानंतर तुम्ही जो डायट फॉलो करता किंवा जो व्यायाम करता तो नियमित करणे गरजेचे आहे. ते याकरिता की जर तुम्ही एकदा तुमची डायबिटीज नियंत्रणात आले त्यानंतर तुम्ही हे सर्व गोष्टी सोडल्या तर त्यानंतर ती परत वाढण्याची शक्यता असते.
advertisement
त्यामुळे तुम्ही पंधरा दिवसात, महिन्यात, तीन महिन्याला, दोन महिन्याला अशा पद्धतीने तुमची जी डायबिटीज आहे त्याची टेस्ट करणं गरजेचं आहे. त्यासोबतच डॉक्टरांनी जे पण काही गोळ्या दिल्या असतील तर तुम्ही व्यवस्थितरित्या घेणं गरजेचं आहे म्हणजेच की जरी तुमची सर्व डायबिटीज नियंत्रणात असेल आणि ती परत वाढू नये याकरिता काळजी तुम्ही घेणे गरजेचे आहे, असं मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर मयुरा काळे यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
November 13, 2025 9:36 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Diabetes Day 2025 : डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे काय? शरीराला कसा होतो फायदा? Video

