रक्तदान करण्यापूर्वी काय काळजी घ्यावी?
आपण सर्वांनी रक्तदान करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी आपण रक्तदान करणार आहोत ती जागा स्वच्छ असणं गरजेचं आहे. तसेच आपण रक्तदान करताना ते अधिकृत व्यक्तींकडूनच रक्तदान केले पाहिजे. म्हणजेच रक्तदान करताना कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे. तसंच रक्तदान करण्यापूर्वी आपण आपलं हिमोग्लोबिन आणि वजन तपासून घेणे गरजेचे आहे.
advertisement
World Blood Donor Day: सर्वात दुर्मीळ रक्तगट, ज्यांना रक्त मिळणंही कठीण, तुम्हाला माहितीय का?
वजन आणि हिमोग्लोबिन किती असावं?
रक्तदान करताना आपलं वजन 45 किलो पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. तर आपले हिमोग्लोबिन हे 12 च्या पुढे असणे गरजेचे आहे. तुम्हाला कुठला आजार तर नाही ना हे देखील आपण तपासून घ्यायला हवं. तसेच रक्तदान केंद्रात देखील आपण संपूर्ण माहिती घेणं गरज आहे. तसेच आपण देखील संबंधितांना आपली संपूर्ण मेडिकल हिस्ट्री सांगणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण रक्त देताना किंवा त्यानंतर कोणताही त्रास होणार नाही.
शुगर, बीपीवाले रक्तदान करू शकतात का?
जर तुम्हाला शुगर किंवा ब्लडप्रेशर असेल तरी देखील तुम्ही रक्तदान करू शकता. पण त्यासाठी तुम्ही अगोदर व्यवस्थित तपासणी करून घेणं गरजेचं असल्याचं डॉक्टर सांगतात. पुरुष दर तीन महिन्याला रक्तदान करू शकतात. तर स्त्रिया या दर चार महिन्याला रक्तदान करू शकतात.
दरम्यान, रक्तदान करण्यापूर्वी योग्य ती काळजी घेऊनच रक्तदान करावं. तुमचं रक्त कुणाचातरी जीव वाचवू शकतं. तसेच तुमच्या आरोग्याला देखील ते लाभदायी ठरतं, असंही डॉक्टर सांगतात.