TRENDING:

पिवळे दात होतील पांढरे चकचकीत, तोंडाची दुर्गंधीही होईल गायब, टूथपेस्टच्या आधी 'हे' लावा!

Last Updated:

तोंडातून दुर्गंधी आली की आपल्यासोबत बोलणाऱ्यांची पंचाईत होते. परंतु काळजी करू नका. काही सोप्या उपायांनी आपण दातावर जमलेले पिवळे थर आणि तोंडाची दुर्गंधी दूर करू शकता. तज्ज्ञांनी याबाबत माहिती दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गुलशन कश्यप, प्रतिनिधी
तोंडाच्या दुर्गंधीमागे असू शकतात विविध कारणे.
तोंडाच्या दुर्गंधीमागे असू शकतात विविध कारणे.
advertisement

जमुई : आपल्या दातांवर पिवळे डाग पडू लागले की कधी दात पूर्ण किडतात आणि तोंडातून दुर्गंधी येऊ लागते कळतही नाही. मग ही दुर्गंधी असह्य होऊन त्यावर उपाय करणंही कठीण होतं. अशावेळी आपल्यासोबत बोलणाऱ्यांची मात्र पंचाईत होते. परंतु काळजी करू नका. काही सोप्या उपायांनी आपण दातावर जमलेले पिवळे थर आणि तोंडाची दुर्गंधी दूर करू शकता. तज्ज्ञांनी याबाबत माहिती दिली आहे.

advertisement

घरात तुळशीचं रोप असायलाच हवं असं म्हणतात ते काही उगीच नाही. तुळशीची पानं अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणांनी संपन्न असतात. विविध आजारांवर तुळस गुणकारी ठरते. दातांच्या, तोंडाच्या आरोग्यासाठी ही पानं अतिशय फायदेशीर असतात. डॉक्टरांनी सांगितलं की, तुळशीच्या पानांमुळे हिरड्यांवरील सूजही कमी होते. कीड लागण्यापासून दातांचं रक्षण होतं आणि तोंडातून दुर्गंध येत नाही.

advertisement

तुळशीच्या पानांचा नियमित वापर केल्यानं पिवळे दातही पांढरे चकचकीत होऊ शकतात, असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यासाठी तुळशीची पानं उन्हात सुकवून त्यांची पावडर बनवून घ्यावी. दररोज ब्रश करण्यापूर्वी या पावडरने दात घासावे. यामुळे दातांवर जमलेला पिवळा थर हळूहळू कमी होतो आणि दात छान चमकदार दिसतात.

डॉक्टरांनी सांगितलं की, चमचाभर तुळशी पावडरमध्ये मोहरीच्या तेलाचे काही थेंब घालून आपण दात आणि हिरड्या घासू शकता. यामुळे दात भक्कम होतात आणि हिरड्या निरोगी राहतात. जर आपल्याकडे तुळशी पावडर नसेल तर थेट तुळशीची पानं वाटून त्या पेस्टने दात घासू शकता. या नैसर्गिक टूथपेस्टमुळे तोंडाची दुर्गंधीही दूर होऊ शकते. तसंच दातांची नैसर्गिक चमकही आपण परत मिळवू शकता, असं डॉक्टर म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
पिवळे दात होतील पांढरे चकचकीत, तोंडाची दुर्गंधीही होईल गायब, टूथपेस्टच्या आधी 'हे' लावा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल