basil leaves: तुम्हीही तुळशीची पाने तोडता? मग हे नियम माहितच असायला हवे

Last Updated:

हिंदूधर्मात अनेक वनस्पतींना आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. वड, पिंपळ, तुळस आदींचा यात प्रामुख्याने समावेश होतो. धर्मशास्त्रात तुळस अतिशय पवित्र आणि पूजनीय मानली जाते.

 तुम्हीही तुळशीची पाने तोडता?
तुम्हीही तुळशीची पाने तोडता?
नवी दिल्ली : हिंदूधर्मात अनेक वनस्पतींना आध्यात्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. वड, पिंपळ, तुळस आदींचा यात प्रामुख्याने समावेश होतो. धर्मशास्त्रात तुळस अतिशय पवित्र आणि पूजनीय मानली जाते. भगवान श्रीविष्णु तुळशीखाली वास करतात आणि तुळस हे लक्ष्मी मातेचं रुप असल्याचं मानलं जातं. पूर्वी प्रत्येक घराच्या अंगणात मुख्य दरवाजासमोर तुळशीचं सुबक वृंदावन असायचं. पण आता काळ बदलला असून आता घराच्या बाल्कनीत तुळशीचं रोप ठेवलं जातं. तुळशीसंबंधीचे काही खास नियम धर्मशास्त्रात सांगितले गेले आहेत. तुळशीची पानं नेमकी कधी तोडावीत याबाबत ही विशेष उल्लेख आध्यात्मिक ग्रंथांमध्ये आहेत. तुळशीची पानं तोडताना नेमक्या कोणत्या नियमांचं पालन करायचं ते सविस्तर जाणून घेऊया.
हिंदू धर्मात तुळस पूजनीय आणि पवित्र मानली जाते. तुळशीच्या रोपामुळे घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मकता येतं, असं वास्तुशास्त्र सांगतं. तुळशीखाली भगवान विष्णु तर रोपात लक्ष्मीमातेचा वास असतो, असं मानलं जातं. त्यामुळे तुळशीची नियमित पूजा केली जाते. दिवाळीनंतर तुळशीचा विधीवत विवाह केला जातो. तुळशीच्या संगोपनासाठी फार काही करावं लागत नाही. आपल्याकडे काही विशिष्ट कारणांसाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. आयुर्वेदात देखील औषध तयार करण्यासाठी तुळस वापरतात. पण तुळशीची पानं तोडण्याबाबत काही नियम सांगितले गेले आहेत. या नियमांचे पालन प्रत्येकानं करणं गरजेचं आहे.
advertisement
आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या दिवसापासून तेरा दिवस तुळशीला स्पर्श करू नये. तसेच तिची पाने तोडू नये, असं धर्मशास्त्र सांगतं. तसेच स्नान न करता तुळशीला स्पर्श करू नये आणि तिची पानं तोडू नयेत. संध्याकाळी तुळशीची पानं तोडणं निषिद्ध मानलं जातं. पण जर तुम्हाला औषधोपचारासाठी पानांची गरज असेल तर केवळ याच कारणासाठी तुम्ही पानं तोडू शकता अन्यथा संध्याकाळी तुळशीची पाने कदापि तोडू नयेत. कोणत्याही कारणासाठी तुम्हाला तुळशीची पानं तोडायची असतील तर ती तोडण्याकरिता चाकू, कात्री सारखी धारदार शस्त्र किंवा बोटाच्या नखांचा वापर करू नये. नुसत्या बोटांनी हळूवारपणे पानं तोडावीत. तुळशीच्या रोपात लक्ष्मीमातेचा वास असतो. त्यामुळे तुम्हाला जर तुळशीची पानं तोडायची असतील तर त्यापूर्वी तुळशीसमोर हात जोडून मनोमन प्रार्थना करावी आणि पानं तोडण्यासाठी लक्ष्मीमातेची परवानगी घ्यावी. तुळशीच्या संदर्भात या नियमांचे पालन जर तुम्ही केले तर भगवान विष्णु आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी प्राप्त होऊन घरात सुख-समृद्धी नांदेल.
मराठी बातम्या/अध्यात्म/
basil leaves: तुम्हीही तुळशीची पाने तोडता? मग हे नियम माहितच असायला हवे
Next Article
advertisement
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं, मुलीही ऐकून रडतात
जितेंद्रच्या हिरोइनचं गाणं, 40 वर्षांनंतरही ऐकून प्रत्येक आईचे हृदय तुटतं
    View All
    advertisement