जाणून घेऊयात वरिष्ठ आहारतज्ज्ञ खुशबू शर्मा वजन कमी करण्यासंदर्भात काय टिप्स आणि सल्ला देत आहेत.
advertisement
उपाशी राहणं धोक्याचं :
आहारतज्ज्ञ खुशबू शर्मा सांगतात की, वजन कमी करण्यासाठी उपाशी राहणं हे केव्हाही धोक्याचं आहे. कारण आपल्या शरीराच्या दैनंदिन कार्यासाठी विविध पोषकतत्वांची आवश्यकता असते. त्यामुळे शरीराला योग्य त्या प्रमाणात पोषक तत्व मिळाली नाहीत शरीराच्या कार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उपाशी राहणं सोडाच तुम्ही जर शरीराच्या आवश्यकतेपेक्षा कमी जरी खाल्लं तरीही तुमच्या शरीराला धोका निर्माण होऊ शकतो.
हे सुद्धा वाचा : वजन कमी करायचं आहे पण, जंक फूड खाण्यापासून स्वतःला रोखू शकत नाही? फॉलो करा या टिप्स
उपाशी राहिल्याने थकवा, दुर्बलता वाढते
खुशबू सांगतात की, कमी जेवल्याने किंवा उपाशी राहिल्यावे वजन कमी होत नाही, उलट शरीर दुर्बल किंवा कृश होतं. उपाशी राहिल्याने तुमच्या शरीरावरचे फॅटस् बर्न होतात. त्यामुळे तुम्हाला वजन कमी झाल्यासारखं जाणवतं. आणखी वजन कमी होईल या आशेने तुम्ही जास्त वेळ उपाशी राहता किंवा कमी खाता आणि इथेच तुम्ही मोठी चूक करता. कारण दीर्घकाळ उपाशी राहिल्याने फॅटलॉस होतो. वेटलॉस नाही. शरीराला उर्जा न मिळाल्याने अतिरिक्त चरबी जळते. मात्र शास्त्रीय भाषेत हा वेटलॉस नसून इंचलॉस असतो. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहाराची गरज आहे. कारण शरीराला योग्य त्या प्रमाणात उर्जा ही मिळायलाच हवी. अन्यथा शरीर तुम्हाला विशिष्ट संकेत देऊ लागते आणि म्हणूनच डाएटिंग करताना तुमच्या शरीराला योग्य पोषण न मिळाल्याने अशक्तपणा जाणवू लागतो.
संतुलित आहार आरोग्याच्या फायद्याचा :
आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या सुरळीत कार्यासाठी त्याला उर्जेची गरज असते. ही गरज अन्नातूनच पूर्ण होते. आता प्रत्येक व्यक्तीनुरूप आवश्यक त्या उर्जेच्या प्रमाणात बदल होऊ शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर स्थूल व्यक्तीला जास्त उर्जेची गरज भासेल तर शिजशिडीत व्यक्तीला कमी उर्जेची गरज भासेल. त्यामुळे तुम्ही जास्त अन्न खाल्लं तरीही तुम्हाला त्रास होईल आणि कमी अन्न खाल्लं तरीही तुम्हाला त्रास होईल. त्यामुळे योग्य त्या प्रमाणात संतुलित आहार घेण्याची गरज आहे. ज्यामुळे शरीराला नुकसान होणार नाही.
‘ही’ लक्षणं दिसताच व्हा सावध, योग्य प्रमाणात घ्या पोषक आहार.
डोकेदुखी : शरीराला जेव्हा उर्जेची गरज असते मात्र ती मिळत नाही तेव्हा डोकेदुखी सुरू होते. त्यामुळे तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर समजून जा की हा डोकेदुखीचा त्रास उपाशी राहिल्यामुळे होतोय. त्यामुळे वाट न बघता काही तरी पौष्टीक खाऊन घ्या.
- सतत भूक लागणे : हे सुद्धा शरीरीला उर्जेची गरज असण्याचा एक संकेत आहे. मुळातच तुमच्या शरीरात उर्जेची कमतरता असते, ती भरून काढण्यासाठी तुम्हाला सतत भूक लागते आणि म्हणूनच तुमच्या मनात सतत काही ना काही खाण्याचे विचार येत राहातात.
- चिडचिड : उपाशी राहिल्याने तुमची सतत चिडचिड होत राहते आणि मन अस्वस्थ राहतं.
- एकाग्रता कमी होते: उपाशी राहिल्याने किंवा कमी जेवल्याने एकाग्रता कमी होते. कोणत्याही कामात लक्ष केंद्रित करता येत नाही. कामात काही ना काही चुका होत राहतात.
- थकवा : उपाशी राहिल्याने, डोकेदुखीचा त्रास झाल्याने रक्तदाब आणि रक्तातली साखर कमी होते. त्यामुळे थकवा येऊन थोडं जरी चाललो तरीही चक्कर आल्यासारखं वाटतं.
तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएटच्या नावाने कमी जेवत असाल किंवा उपाशी राहात असाल आणि तुम्हालाही तुमच्या शरीराने असे संकेत दिले तर समजून जा की तुमचं डाएट हे चुकीच्या मार्गाने जात आहे. योग्य डाएट आणि मार्गदर्शनासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.