World`s Best diet: ‘हा’जगातला नाही तर आहे पृथ्वीवरचा सर्वोत्तम आहार, नियमित सेवनाने राहाल फिट आणि तंदुरूस्त

Last Updated:

Health Benefits of Mediterranean Diet in Marathi: वर्ल्ड रिपोर्ट 2025 ने सर्वोत्कृष्ट आहारासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. ज्यात त्यांनी मेडिटेरेनियन डाएटला पृथ्वीवरचा सर्वोत्तम आहार मानलाय. आयोजकांनी या आहाराला 5 पैकी 4.8 गुण दिलेत.

प्रतिकात्मक फोटो :  ‘हा’ जगातला नाही तर आहे पृथ्वीवरचा सर्वोत्तम आहार, नियमित सेवनाने राहाल फिट आणि तंदुरूस्त
प्रतिकात्मक फोटो : ‘हा’ जगातला नाही तर आहे पृथ्वीवरचा सर्वोत्तम आहार, नियमित सेवनाने राहाल फिट आणि तंदुरूस्त
मुंबई: चांगला आहार आणि निरोगी आयुष्य हे परस्परांसाशी जोडलेले आहेत. जोपर्यंत आपण चांगलं अन्न खाणार नाही तोपर्यंत रोगप्रतिकार शक्ती वाढून आपण फिट राहणार नाही. तसंच जोपर्यंत आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होत नाही, संक्रमणांचा धोका टळत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही चांगलं अन्न खाल्लं तरीही त्याचे फायदे शरीराला होत नाही. त्यामुळे फिट राहून आजारांना दूर करण्यासाठी चांगला आहार घेणं महत्त्वाचं ठरतं.

चांगला आहार म्हणजे काय ?

व्यक्ती तितक्या प्रकृती या म्हणीप्रमाणे किंवा दर 10 कोसांवर भाषा बदलले या वाक्याप्रमाणे प्रत्येकाच्या आवडीनिवडी, खाण्याच्या सवयी या वेगळ्या असू शकतात. उदा. दूध, डाळी आणि मांसाहार हा प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो. त्यामुळे शाकाहारी व्यक्ती मासे, मटन न खाता दूध किंवा डाळी खाऊन प्रथिनं मिळवू शकतील. त्यामुळे प्रत्येकासाठी चांगल्या सकस आहाराची व्याख्या बदलू शकते. तुम्ही कुठेही राहात असला तरीही तुम्ही जर पोषकतत्त्वांनी परिपूर्ण असा आहार घेतलात तर तुमच्या शरीराला अनेक फायदे होतील. जाणून घेऊयात फक्त तुमच्या जिल्ह्यातला, राज्यातला, देशातला किंवा या जगातला नाही तर पृथ्वीवरचा सर्वोत्तम आहार कोणता आहे तो.
advertisement

‘हा’ आहे पृथ्वीवरचा सर्वोत्तम आहार

Health Benefits of Mediterranean Diet in Marathi: ‘हा’ जगातला नाही तर आहे पृथ्वीवरचा सर्वोत्तम आहार, नियमित सेवनाने राहाल फिट आणि तंदुरूस्त
advertisement
वर्ल्ड रिपोर्ट 2025 ने सर्वोत्कृष्ट आहारासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. ज्यात त्यांनी मेडिटेरेनियन डाएटला पृथ्वीवरचा सर्वोत्तम आहार मानलाय. आयोजकांनी या आहाराला 5 पैकी 4.8 गुण दिलेत. डॅश डाएट DASH DIET दुसरा क्रमांक मिळालाय. तिसऱ्या क्रमांकावर फ्लेक्सिटेरियन डाइट तर चौथ्या क्रमांकावर MIND डाएटने पटकावला आहे. पृथ्वीवरच्या सर्वोत्तम आहाराची निवड  करताना, प्रामुख्याने त्यात असलेली पोषकतत्वं आणि त्याचे शरीराला मिळणाऱ्या फायदे यांचा विचार करून या सर्वोत्तम आहाराची निवड केली गेलीये.
advertisement

मेडिटेरेनियन डाएट म्हणजे काय ?

मेडिटेरेनियन म्हणजे भूमध्य सागर असं साधं सोपं भाषांतर. त्यामुळे भूमध्यसागराच्या आजूबाजूला आढळून येणारे स्पेन, फ्रान्स, इटली, स्लोव्हेनिया, क्रोएशिया, बोस्निया, ग्रीस, तुर्की, सीरिया, लेबनॉन, इस्रायल यासारख्या अन्य देशातली खाद्यसंस्कृती, तिथे आढळून येणारी फळं,भाज्या, संपूर्ण धान्य, विविध प्रकारची कडधान्ये, मासे, त्यांची अन्न तयार करण्याची पद्धत, त्यांची आहार  पद्धती, सगळ्याला मेडिटेरेनियन डाएट असं म्हटलं जातं.
advertisement

मेडिटेरेनियन डाएटचे फायदे?

मेडिटेरेनियन डाएटमध्ये विविध प्रकारच्या अन्न पदार्थांचा समावेश होतो. त्यामुळे शरीराला एकाच वेळी अनेक पोषकतत्त्वे मिळतात. याशिवाय हे डाएट गुणवत्ता आणि जीवनशैली सुधारण्यातही फायद्याचं आहे. अनेक अभ्यासात असंही आढळून आलंय की, या आहारामुळे हृदयरोग आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो. मेडिटेरेनियन डाएटमुळे फक्त जेवणाची गुणवत्ता सुधारत नाही त्या व्यक्तीच्या आर्युमानतही वाढ होते.
advertisement

... म्हणून मेडिटेरेनियन डाएट सर्वोत्तम

शरीला उर्जा आणि ताकद देण्यासाठी प्रथिनांची गरज असते. ज्यामुळे स्नायू मजबूत होतात. आहारातल्या विविध  बियांपासून ओमेगा-3 फॅटी ॲसिड मिळतं. ज्यामुळे हृदयाचं आणि मेंदूचं आरोग्य सुधारतं. या आहारात असलेल्या संपूर्ण धान्य आणि भाज्यांमधून फायबर्स चांगल्या  प्रमाणात मिळतात. त्यामुळे पचन सुधारायसा मदत होते. त्यामुळे या आहारातून प्रोटिन्स, फॅटस, फायबर, व्हिटॅमिन अशी सगळी पोषकतत्वं मिळत असल्याने मेडिटेरेनियन डाएट हा पृथ्वीवरचा सर्वोत्तम आहार मानला जातो.
advertisement
Health Benefits of Mediterranean Diet in Marathi: ‘हा’ जगातला नाही तर आहे पृथ्वीवरचा सर्वोत्तम आहार, नियमित सेवनाने राहाल फिट आणि तंदुरूस्त

भारतीयांसाठी काय ?

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अन्नाला पूर्णब्रह्म म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही साधा, पोषक आहार जरी घेतला तरीही तुम्हाला अनेक फायदे होतील. मेडिटेरेनियन डाएटमध्ये असलेले प्रोटिन्स, फॅट्स, फायबर्स हे आपल्याला वरण, भात, भाजी, डाळी, फळं यातूनही मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही जरी भूमध्यसागरी प्रदेशात राहात जरी नसलात तरी मेडिटेरेनियन डाएटमध्ये जे घटक असतात ते तुमच्या रोजच्या अन्नपदार्थात आढळूनच येतात. त्यामुळे तुम्हालाही मेडिटेरेनियन डाएटचे फायदे हे मिळतच आहेत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
World`s Best diet: ‘हा’जगातला नाही तर आहे पृथ्वीवरचा सर्वोत्तम आहार, नियमित सेवनाने राहाल फिट आणि तंदुरूस्त
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement