TRENDING:

Heart Attack : हार्ट अटॅक येऊ नये म्हणून कोणती लस आहे का?

Last Updated:

Heart Attack : दक्षिण कोरियातील क्युंग ही युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसीनच्या प्राध्यापकांनी  हार्ट अटॅक रोखणाऱ्या लशीबाबत अभ्यास केला. हा अभ्यास 12 लाखांहून अधिक लोकांच्या विमा डेटावर आधारित आहे, ज्यांचं सरासरी सहा वर्षे निरीक्षण केलं गेलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : हार्ट अटॅक म्हटलं की पूर्वी फक्त वयस्कर माणसांचा आजार समजला जायचा. पण आता कमी वयातही हार्ट अटॅक येऊ लागला आहे. हार्ट अटॅक कधी, कुठे, कुणाला, कसा येईल सांगू शकत नाही. त्यामुळे हार्ट अटॅक येऊ नये, यासाठी काय करता येईल, यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचवेळी असा प्रश्न पडतो की, जसं काही आजारांना रोखण्यासाठी लस आहे, तसं हार्ट अटॅक येऊ नये म्हणून कोणती लस आहे का?
News18
News18
advertisement

दक्षिण कोरियातील क्युंग ही युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसीनच्या प्राध्यापकांनी  हार्ट अटॅक रोखणाऱ्या लशीबाबत अभ्यास केला. हा अभ्यास 12 लाखांहून अधिक लोकांच्या विमा डेटावर आधारित आहे, ज्यांचं सरासरी सहा वर्षे निरीक्षण केलं गेलं. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये हा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे.

संशोधनात काय आढळलं?

चाचण्यांमध्ये असं आढळून आलं आहे की हर्पस झोस्टर शिंगल्ससाठी बनवलेली लस हार्ट अटॅक रोखू शकते.

advertisement

ही लस हृदयाशी संबंधित आजारांचा एकूण धोका 23 टक्के, हृदयविकाराचा झटका 22 टक्के आणि हृदयविकाराचा धोका 26 टक्क्यांनी कमी करते. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की जर शिंगल्स नावाची ही लस एकदा दिली तर पुढील 8 वर्षांसाठी हृदयविकाराचा धोका कमी होईल. ही लस 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरू शकते कारण या वयानंतर हृदयविकाराचं प्रमाणही जास्त असतं.

advertisement

Heart Attack : पोटात दुखलं तरी येऊ शकतो हार्ट अटॅक, कनेक्शन काय?

शिंगल्स म्हणजे काय?

शिंगल्स हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. ज्यामुळे शरीराच्या एका बाजूला वेदनादायक पट्ट्यांसारखे पुरळ उठतं. हे कांजण्या विषाणू (व्हॅरिसेला-झोस्टर) च्या पुनरुत्थानामुळे होतं. सहसा हा संसर्ग जेव्हा शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होते तेव्हा होतो. अभ्यासात, ही लस 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना देण्याचा सल्ला देण्यात आला आहे जेणेकरून या विषाणूचा संसर्ग रोखता येईल.

advertisement

हृदयावर ही लस कशी काम करते?

या अभ्यासाचे प्रमुख लेखक प्रोफेसर डोंग केओन येओन म्हणाले की, आमच्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की शिंगल्स लस हृदयरोगाचा धोका देखील कमी करू शकते. जरी एखाद्या व्यक्तीला कोणताही धोका नसला तरीही, ही लस हृदयविकार रोखण्यासाठी रामबाण उपाय ठरू शकते. या लसीचा परिणाम 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या आणि अस्वास्थ्यकर जीवनशैली असलेल्या लोकांमध्ये अधिक स्पष्टपणे दिसून आला.

advertisement

ही लस कशी काम करते हे अद्याप पूर्णपणे माहिती नाही, पण शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की ही लस शिंगल्सला प्रतिबंधित करते. या आजारामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. त्यामुळे ते अप्रत्यक्षपणे हृदयाचं रक्षण करू शकते. मागील अभ्यासातून असं दिसून आलं आहे की कोणत्याही संसर्गामुळे हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकाराचा धोका 1.5 ते 2 पट वाढू शकतो. शिंगल्स रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात आणि जळजळ आणि रक्त गोठण्याचा धोका वाढवतात, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.

Heart Attack : हा ब्लड ग्रुप असेल तर येऊ शकतो हार्ट अटॅक, तुमचा रक्तगट तर नाही ना तपासा

ही लस भारतात उपलब्ध आहे का?

जगभरात दोन प्रकारच्या शिंगल्स लशी उपलब्ध आहेत. एक जिवंत आहे, जो विषाणूला कमकुवत करतो आणि दुसरा रीकॉम्बीनंट तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केला जातो, ज्यामध्ये विषाणूचे असे भाग समाविष्ट असतात जे रोग निर्माण करत नाहीत. या दोन्ही लशी भारतात उपलब्ध आहेत. शास्त्रज्ञांचा सल्ला आहे की 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी ही लस निश्चितच घ्यावी.

(सूचना : हा लेख संशोधनावर आधारित आहे. जो फक्त सामान्य माहितीसाठी देण्यात आला आहे. न्यूज18मराठी याची हमी देत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : हार्ट अटॅक येऊ नये म्हणून कोणती लस आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल