एका एका विशिष्ट महिन्यात विशिष्ट वारी आणि विशिष्ट वेळी हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या दिवशी हार्ट अटॅकचा धोका जास्त असतो. हार्ट अटॅकची काही प्रकरणं याच कालावधीत दिसतात त्यानुसार हा अंदाज बांधण्यात आला आहे.
कोणत्या महिन्यात हार्ट अटॅकचा जास्त धोका?
हिवाळा ऋतूची सुरू होताच हार्ट अटॅकचं प्रमाण वाढू लागते. डिसेंबर, जानेवारीत हार्ट अटॅकच्या अनेक घटना समोर येतात. हार्ट अटॅक कोणत्याही ऋतूत येऊ शकतो, पण त्याचा धोका हिवाळ्यात जास्त असतो.
advertisement
कारणं काय?
नवी दिल्ली येथील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वनिता अरोरा यांनी सांगितलं की, हिवाळ्यात हृदयविकाराच्या घटनांमध्ये वाढ होण्याचं कारण हवामानातील तापमान कमी होणं. हिवाळ्यात कमी तापमानामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्त हळूहळू हृदयापर्यंत पोहोचते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात. अशा स्थितीत रक्तपुरवठा खंडित होऊन हार्ट अटॅक येतो.
कोणत्या वारी हार्ट अटॅकचा जास्त धोका?
ब्रिटिश हार्ट फाउंडेशनच्या संशोधनानुसार आठवड्यातील इतर दिवसांच्या तुलनेत सोमवारी हृदयविकाराचा झटका (STEMI) येण्याची शक्यता जास्त असते. मात्र रविवारीही हृदयविकाराच्या झटक्यांमध्ये सर्वसाधारण वाढ झाली आहे.
हा अभ्यास ब्रिटिश कार्डिओव्हस्कुलर सोसायटीच्या परिषदेत सादर करण्यात आला, ज्यामध्ये हृदयविकाराचा झटका येण्याची वेळ आणि कारणं यावर संशोधन करण्यात आलं.
कारणं काय?
तज्ज्ञांच्या मते काही पुराव्यांनुसार याचं कारण सोमवारी तणावाच्या हार्मोन्सशी संबंधित असू शकतं. बेलफास्ट हेल्थ अँड सोशल केअर ट्रस्टचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. जॅक लाफन म्हणाले की कामावर परत येण्याच्या तणावामुळे असं होऊ शकतं. इतकंच नाही तर वाढलेल्या तणावामुळे स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.
Heart Attack : छातीतील वेदना गॅसमुळे की हार्ट अटॅक, हे कसं ओळखायचं?
2005 च्या अभ्यासात असंही आढळून आलं की, 'ब्लू मंडे'च्या दिवशी पुरुषांमध्ये हृदयविकाराचा झटका अधिक प्रमाणात येतो आणि याचा संबंध अल्कोहोलच्या सेवनाशी देखील होता.
कोणत्या वेळेला हार्ट अटॅकचा जास्त धोका?
हार्ट अटॅकच्या बऱ्याच केसेस या सकाळच्या वेळेस घडल्या आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे. खास करून पहाटे 3 ते 4 आणि सकाळी 6 ते 9 किंवा 6 ते 12 या वेळेमध्ये सर्वाधिक हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे.
स्पॅनिश तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार पहाटे 3-4 वाजता आणि त्यानंतर येणारे हृदयविकाराचे झटके इतर वेळेपेक्षा जास्त धोकादायक असतात. हा हृदयविकाराचा झटका इतका तीव्र असतो की एखाद्या व्यक्तीला वाचण्याची शक्यता खूप कमी असते. पण आता प्रश्न असा की या वेळेसच का येतो अटॅक?
कारणं काय?
एम्सचे माजी सल्लागार आणि साओल हार्ट सेंटरचे संचालक हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बिमल छाजेड म्हणाले की, सकाळी 6 ते दुपारी 12 या वेळेत हृदयविकाराच्या झटक्यांच्या जास्त घटनांमागील मुख्य कारण म्हणजे शरीरातील सर्केडियन रिदम म्हणजे 24 तासांचं जैविक चक्र आणि हार्मोनल बदल. खरं तर, सकाळी शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव येतो.
Heart Attack : पायात दिसतात हार्ट अटॅकची लक्षणं, तुम्हाला तर नाही ना ही समस्या
खरंतर सकाळी उठल्यावर आपल्या सर्वांच्या शरीरातील कोर्टिसोल नावाचं एक होर्मोन असतं, जे सर्वात जास्त बनतं. कोर्टिसोलला स्ट्रेल हार्मोन्स देखील म्हणतात. हे होर्मोन्स रक्तदाब वाढवतं ज्यामुळे हृदयावर जास्त दबाव पडते. या शिवाय सकाळच्या वेळी आपल्या रक्तात रक्त जमा करणारे पदार्थ ही जास्त असतात. जे हार्ट अटॅकच्या धोक्याला सर्वाधिक वाढवते.
सकाळी रक्तदाब नैसर्गिकरित्या वाढतो, ज्याला मॉर्निंग सर्ज म्हणतात. या सर्जमुळे हृदयाच्या धमन्यांवर दबाव वाढतो. जर धमन्यांमध्ये आधीच प्लेक जमा झाला असेल तर त्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो.
रात्री शरीरातील पाणी कमी होते, ज्यामुळे सकाळी रक्त जाड होते. यामुळे रक्त गोठण्यास मदत करणाऱ्या पेशी, म्हणजेच प्लेटलेट्स, अधिक सक्रिय होतात. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. जर या गुठळ्यामुळे कोरोनरी धमनीमध्ये अडथळा निर्माण झाला तर हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
रात्री शरीर आरामदायी स्थितीत असते, परंतु सकाळी उठल्यावर ते सक्रिय स्थितीत येते. या बदलादरम्यान, हृदयाला अधिक ऑक्सिजन आणि रक्ताची आवश्यकता असते. जर रक्तवाहिन्या अरुंद किंवा ब्लॉक झाल्या तर ही मागणी पूर्ण होऊ शकत नाही आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.
Heart Attack : कुणाला हार्ट अटॅक आला तर सगळ्यात आधी काय करायचं?
स्पॅनिश संशोधनानुसार पहाटे 3-4 वाजता आणि त्यानंतरच्या काही तासांत दिवसाच्या तुलनेत 20% जास्त मृत स्नायू पेशी असतात. हृदय संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करते. याशिवाय, त्याला मृत पेशी देखील काढून टाकाव्या लागतात. यामुळे हृदयाला खूप दबावाखाली काम करावं लागते. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे, विश्रांतीच्या स्थितीमुळे रक्तवाहिन्या थोड्याशा आकुंचन पावतात. रक्तपुरवठा खंडित झाल्यावर तयार होणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या हृदयविकाराचा झटका आणतात.
ब्रिघम अँड वुमेन्स हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर फ्रँक एजेएल शीर यांनी सांगितलं की, सर्केडियन रिदम म्हणजेच बॉडी क्लॉक सकाळी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकसाठी जबाबदार आहे. सर्केडियन सिस्टम अनेक मानसिक पॅरामीटर्स नियंत्रित करू शकते. एखादी व्यक्ती खूप संवेदनशील होऊ शकते. ज्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होतो.
उदाहरणार्थ, हे समजून घ्या की या सिस्टममुळे हृदय सकाळी रक्ताच्या गुठळ्या काढून टाकू शकत नाही आणि हृदयविकाराचा झटका येतो. संशोधनातून असे दिसून आले आहे की सर्कॅडियन सिस्टम सकाळी जास्त PAI-1 पेशी सोडते. या पेशी रक्तात तयार होणाऱ्या गुठळ्या वाढवण्याचे काम करतात. हेच हृदयविकाराचं कारण आहे.