Heart Attack : पायात दिसतात हार्ट अटॅकची लक्षणं, तुम्हाला तर नाही ना ही समस्या
- Published by:Priya Lad
Last Updated:
Heart Attack Symptoms : हृदयाशी संबंधित समस्यांची लक्षणं पायांमध्येही दिसू शकतात. आपल्या पायांमध्ये होत असलेले बदल लक्षात आले तर अगदी सुरुवातीच्या टप्प्यातही हृदयविकारांवर उपचार मिळवता येऊ शकतात.
नवी दिल्ली : हार्ट अटॅक म्हटलं की छातीत दुखणं हेच आपल्यासमोर येतं. सामान्यपणे छातीत दुखणं हे हृदयविकाराचं मुख्य लक्षण मानलं जातं. मात्र या समस्येची लक्षणं अधिक व्यापक असू शकतात. हार्ट अटॅकची काही लक्षणं आपल्याला आधीच दिसतात. काही वेळा हृदयाशी संबंधित समस्यांची लक्षणं पायांमध्येही दिसू शकतात. आपल्या पायांमध्ये होत असलेले बदल लक्षात आले तर अगदी सुरुवातीच्या टप्प्यातही हृदयविकारांवर उपचार मिळवता येऊ शकतात.
'डेली मेल'च्या बातमीत तज्ज्ञ सांगतात, की हृदयरोगाची पहिली लक्षणं आपल्या शरीरात सर्वात आधी पायांमध्ये दिसतात. खरं तर, जेव्हा रक्ताच्या नसांमध्ये चिकट कोलेस्ट्रॉल जमा व्हायला लागतं, तेव्हा रस्ता अरुंद होतो, त्यामुळे शरीराच्या दूरच्या भागांमध्ये कमी रक्त पोहोचतं. त्यामुळे पायांमध्ये त्याची लक्षणं दिसायला लागतात.
advertisement
जेव्हा हृदयाकडून पायापर्यंत योग्य प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन पोहोचत नाही, तेव्हा हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका खूप वाढतो. घोट्यांपर्यंत पोहोचताना रक्तवाहिन्या आधीच खूप बारीक होतात, त्यामुळे तिथे रक्त पोहोचायला आधीच त्रास होतो. आणि जेव्हा रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायला लागतात, तेव्हा आणखी जास्त त्रास होतो.
पायांपर्यंत कमी रक्त पोहोचलं, की तिथे थंड वाटतं, पाय सुन्न होतात. काही वेळा पायांमध्ये दुखतं आणि सूजही येते. पायांपर्यंत कमी रक्त पोहोचलं, की त्याचा परिणाम नखांवरही होतो. त्यामुळे नखं कमजोर आणि ठिसूळ व्हायला लागतात.
advertisement
पायांमधील हार्ट अटॅकची लक्षणं कोणती?
पायांमध्ये वेदना, पेटके येणं किंवा बधीरपणा जाणवणं : पाय सतत दुखणं, विशेषत: रात्री होणाऱ्या वेदना, चालताना होणारा त्रास हे हार्ट डिसिजेसचं लक्षण असू शकतं. पायांमध्ये रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे या समस्या जाणवतात.
advertisement
पायांचा रंग बदलणं : जर पायांचा रंग पिवळा, मातकट किंवा निळा झाला तर हे हृदय आजारी असल्याचं लक्षण असू शकतं. रक्ताभिसरणाच्या समस्यांमुळे पायांचा रंग बदलू शकतो.
पायांना झालेली जखम लवकर बरी न होणं : जर पायाला झालेली जखम लवकर बरी होत नसेल किंवा ही जखम पुन्हा चिघळत असेल तर हे रक्ताभिसरणाच्या समस्येचं लक्षण असू शकतं. डायबेटीस असलेल्या रुग्णांमध्येही ही समस्या दिसून येते.
advertisement
पायावरचे केस गळणं : पायांवरचे केस कमी होणं किंवा गळणं हे शरीराच्या सर्व भागांमध्ये पुरेसं रक्त पोहोचत नसल्याचं लक्षण असू शकतं. हृदयाची गती कमी झाल्यामुळे ही समस्या जाणवू शकते.
पायांच्या नखांची वाढ मंदावणं : पायांची नखं फार हळूहळू वाढत असतील किंवा त्यांचा रंग बदलत असेल तर हे रक्ताभिसरणाच्या समस्येचं लक्षण असू शकतं. आपल हृदय नीट काम करत नसल्याची ही सूचना आहे.
advertisement
ही लक्षणं आरोग्याच्या इतर समस्यांमुळेदेखील दिसू शकतात. जर तुम्हाला यांपैकी कोणतीही लक्षणं दिसली तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. याशिवाय हार्ट डिसिजेसचा धोका कमी करण्यासाठी निरोगी जीव
संशोधनानुसार, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या चारपैकी एका व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या प्रकारे हृदयविकाराचा सामना करावा लागतो. वेळेवर पायांकडे लक्ष दिलं, तर हृदयविकाराच्या गुंतागुंती आधीच कमी करता येऊ शकतात.
Location :
Delhi
First Published :
June 16, 2025 1:33 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : पायात दिसतात हार्ट अटॅकची लक्षणं, तुम्हाला तर नाही ना ही समस्या