TRENDING:

Heart Attack : कानाचं ऐका! हार्ट अटॅक येण्याआधी कान देतो संकेत

Last Updated:

Heart Attack symptoms in ear : सामान्यपणे हार्ट अटॅकचं लक्षण काय, असं विचारल्यावर बहुतेकांचं उत्तर असेल छातीत वेदना. पण आपल्या शरीरातील इतर अवयवांकडून हार्ट अटॅकचे संकेत आधीच मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे कान.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हार्ट अटॅक अचानक येण्याची आणि त्यामुळे जीव जाण्याची कितीतरी प्रकरणं आहे. म्हणून लोक हार्ट अटॅकला घाबरतात. पण हार्ट अटॅकची काही लक्षणं आधीच दिसतात. तसं सामान्यपणे हार्ट अटॅकचं लक्षण काय, असं विचारल्यावर बहुतेकांचं उत्तर असेल छातीत वेदना. पण आपल्या शरीरातील इतर अवयवांकडून हार्ट अटॅकचे संकेत आधीच मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे कान.
News18
News18
advertisement

हार्ट अटॅकपूर्वी व्यक्तीचे कान संकेत देतात. अमेरिकन नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) ने प्रकाशित केलेल्या संशोधनात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. संशोधकांनी 500 हून अधिक हृदयरोगींचा अभ्यास केला आणि असं आढळलं की हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांपैकी 12% रुग्णांना कानाची समस्या होती. यापैकी बऱ्याच लोकांना कानात वेदना जाणवत होत्या, तर काहींना जडपणा किंवा ऐकू कमी होण्याच्या समस्या आल्या होत्या.

advertisement

Heart Attack : हार्ट अटॅक येऊ नये म्हणून कोणती लस आहे का?

या अभ्यासानुसार, हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने केवळ हृदयाच्या नसांमध्येच अडथळा निर्माण होत नाही, तर या गुठळ्या कानाच्या नसांपर्यंतही पोहोचू शकतात. यामुळे कान दुखणे, जडपणा येणे किंवा ऐकू कमी येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

या अभ्यासातून असंही दिसून आलं आहे की कधीकधी छातीत दुखणं किंवा श्वास लागणं यासारखी हृदयविकाराची पारंपारिक लक्षणं आढळत नाहीत. अशा परिस्थितीत कान दुखणं आणि जडपणा यासारख्या अदृश्य लक्षणांकडे लक्ष देणं आवश्यक आहे. विशेषतः वृद्ध आणि मधुमेही रुग्णांमध्ये हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं.

advertisement

Heart Attack : पोटात दुखलं तरी येऊ शकतो हार्ट अटॅक, कनेक्शन काय?

या अभ्यासाचे प्रमुख संशोधक डॉ. डेव्हिड मिलर यांच्या मते, कानात दुखणे किंवा जडपणा हा हृदयविकाराचा झटका येण्याचं संभाव्य लक्षण असू शकतं, विशेषत: जेव्हा तो अचानक आणि कोणत्याही उघड कारणाशिवाय येतो. अशा परिस्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

advertisement

त्यांनी असंही सांगितलं की, कान दुखणं किंवा जड होणं हे हृदयविकाराच्या झटक्याचं एकमेव लक्षण नाही. कानात संसर्ग, सायनस किंवा मायग्रेन यांसारख्या इतर समस्यांचेही हे लक्षण असू शकतं. त्यामुळे नेमकं कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हृदयविकाराच्या झटक्याबद्दल जागरूकता वाढवणं आणि लोकांना त्यांच्या लपलेल्या लक्षणांबद्दल जागरूक करणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून योग्य वेळी उपचार करता येतील, असं डॉ मिलर म्हणाले.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack : कानाचं ऐका! हार्ट अटॅक येण्याआधी कान देतो संकेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल