TRENDING:

Avocado Paneer Toast : दिवसाच्या सुरुवातीला करा भरपेट न्याहारी, झटपट पटापट होणारी रेसिपी नक्की लक्षात ठेवा

Last Updated:

सोशल मीडियावरही स्वादिष्ट आणि पौष्टिक अशा दोन्ही प्रकारच्या पाककृती व्हायरल होत असतात. त्यातलीच एक म्हणजे एवोकॅडो पनीर टोस्ट. ही सोपी आणि पौष्टिक रेसिपी काही मिनिटांत तयार करू शकता. यात मुख्यत: प्रथिनं, हेल्दी फॅट्स आणि फायबर आहेत. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दिवसाची सुरुवात होते न्याहारीनं. न्याहारी अधिक पौष्टिक होण्यासाठी टिप्स शोधत असाल तर ही माहिती नक्की उपयुक्त आहे.
News18
News18
advertisement

सोशल मीडियावरही स्वादिष्ट आणि पौष्टिक अशा दोन्ही प्रकारच्या पाककृती व्हायरल होत असतात. त्यातलीच एक म्हणजे एवोकॅडो पनीर टोस्ट. ही सोपी आणि पौष्टिक रेसिपी काही मिनिटांत तयार करू शकता. यात मुख्यत: प्रथिनं, हेल्दी फॅट्स आणि फायबर आहेत.

Brain Health : अकाली वृद्धत्व रोखा, मेंदू तरुण ठेवण्यासाठी न्यूरोलॉजिस्टनं दिल्यात मोलाच्या टिप्स

advertisement

अ‍ॅव्होकॅडो या सुपरफूडमधे, हेल्दी फॅट्स, फायबर आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वं असतात. तर पनीर हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. फिटनेस प्रेमी आणि वजन नियंत्रण करणाऱ्यांसाठी ही रेसिपी चांगला पर्याय आहे. थोडीशी तयारी केली तर सकाळच्या धावपळीत पटकन होणारा हा पर्याय आहे.

यासाठी दोन ब्रेड स्लाईस, पिकलेला एक एवोकॅडो, किसलेले चीज -  अर्धी वाटी, एक चमचा लिंबाचा रस, अर्धा चमचा काळी मिरी, चवीनुसार - मीठ, एक चमचा ऑलिव्ह ऑइल, अर्धा चमचा मिरचीचे तुकडे आणि थोडी

advertisement

कोथिंबीर

Summer Drink : उन्हाळ्यात कोल्ड्रिंकचा मारा नको, या खास घरगुती पेयांनी करा डिहायड्रेशनपासून रक्षण

प्रथम, ब्रेड स्लाईस टोस्टरमधे किंवा तव्यावर थोडा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. एका भांड्यात, एवोकॅडो चमच्यानं कुस्करुन घ्या. त्यात लिंबाचा रस, मीठ आणि मिरपूड घाला आणि चांगलं मिसळून घ्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

नंतर, एवोकॅडो मिश्रण टोस्ट केलेल्या ब्रेडवर व्यवस्थित पसरवून घ्या. वर किसलेलं चीज घाला. चव वाढवण्यासाठी थोडे चिली फ्लेक्स आणि ऑलिव्ह ऑइल घाला. शेवटी, थोडी कोथिंबीर घाला. एवोकॅडो चीज टोस्ट स्वादिष्ट तर आहेच आणि पौष्टिकही. हा पर्याय न्याहारीला नक्की करुन पाहा.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Avocado Paneer Toast : दिवसाच्या सुरुवातीला करा भरपेट न्याहारी, झटपट पटापट होणारी रेसिपी नक्की लक्षात ठेवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल