TRENDING:

सावध राहा! चीनमधील HMPV भारतात? मोदी सरकारचा अलर्ट, जारी केल्या गाइडलाइन्स

Last Updated:

China HMPV risk for India : नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल HMPV आणि सीझनल इन्फ्लूएंझाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या संपर्कात आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : चीनमध्ये HMPV ने हाहाकार माजवला आहे. तिथल्या रुग्णालयांमध्ये या विषाणूच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. अशात भारतानेही आता धसका घेतला आहे. कोरोनाप्रमाणे भारतातही हा विषाणू घुसतो की काय? अशी भीती निर्माण झाली आहे. याबाबत भारतातही काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. भारताला या आजाराचा किती धोका आहे, हेसुद्धा भारतातील आरोग्य संस्थेने सांगितलं आहे.
प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो
advertisement

चीनमध्ये कोविड-19 सारख्या मानवी मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) चा प्रादुर्भाव झाला आहे. भारतीय हेल्थ एजन्सीने शेजारच्या हा विषाणू सर्दी होण्यास कारणीभूत असलेल्या इतर श्वसन विषाणूंसारखा आहे, काळजी करण्याची गरज नाही, असं म्हचलं आहे. आरोग्य सेवांचे महासंचालक (DGHS) डॉ. अतुल गोयल यांनी सांगितलं की, मानवी मेटापन्यूमोव्हायरस इतर श्वसन विषाणूंप्रमाणे आहे, ज्यामुळे सामान्य सर्दी होते. यामुळे तरुण आणि वृद्ध लोकांमध्ये फ्लूसारखी लक्षणं दिसू शकतात.

advertisement

Virus : चीनमध्ये नवीन Virus मुळे खळबळ! कोरोनापेक्षाही आहे धोकादायक? भारतीय डॉक्टरांचा खुलासा

नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल HMPV आणि सीझनल इन्फ्लूएंझाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या संपर्कात आहे.

डॉ. अतुल गोयल म्हणाले, 'चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) चा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. आम्ही देशातील श्वसनसंबंधी डेटाचं विश्लेषण केले आहे. डिसेंबर 2024 च्या आकडेवारीत कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नाही. आमच्या कोणत्याही आरोग्य संस्थेकडून मोठ्या प्रमाणात प्रकरणं नोंदवली गेली नाहीत. सध्याच्या परिस्थितीबद्दल घाबरण्याची गरज नाही.

advertisement

डॉ. गोयल म्हणाले, "कोणत्याही परिस्थितीत, श्वासोच्छवासाच्या संसर्गाचं प्रमाण हिवाळ्यात वाढतं. ज्यासाठी आवश्यक पुरवठा आणि खाटांची व्यवस्था आमच्या रुग्णालयांमध्ये केली जाते."

त्यांनी लोकांना श्वसन संक्रमण टाळण्यासाठी सामान्य खबरदारी घेण्याचा सल्ला दिला. जर एखाद्याला खोकला आणि सर्दी असेल तर त्यांच्यापासून सावध राहा, त्यांच्या संपर्कात येणं टाळा जेणेकरून संसर्ग पसरणार नाही, असा सल्ला त्यांनी दिला आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
सावध राहा! चीनमधील HMPV भारतात? मोदी सरकारचा अलर्ट, जारी केल्या गाइडलाइन्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल