TRENDING:

फक्त 10 रुपयांपासून मिळतील घर सजावटीच्या हटके वस्तू, पुण्यातल्या ‘या’ ठिकाणी करा खरेदी

Last Updated:

घर सजावटीसाठी फक्त 10 रुपयांपासून किंमत असलेल्या वस्तू मिळणारं पुण्यातलं एक ठिकाण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे, 12 ऑगस्ट : घर सजवण्याच्या प्रत्येकाच्या कल्पना असतात. आपल्या घराचं वेगळेपण जपण्यासाठी  दुर्मीळ वस्तू घेण्याचा प्रयोगही केला जातो. पण, या वस्तू महाग असल्यानं सर्वांनाच खरेदी करणे शक्य होत नाही. घर सजावटीसाठी फक्त 10 रुपयांपासून किंमत असलेल्या वस्तू मिळणारं पुण्यातलं एक ठिकाण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement

शिवाजीनगरच्या बाजूने येताना डेंगळे पूल संपला की कुंभारवेस सुरू होते. अर्थात ‘वेस’ म्हणता येतील असे कोणतेही अवशेष सध्या शिल्लक नाहीत. कुंभारवाड्याच्या परिसराला सुमारे पाचशे वर्षांचा इतिहास आहे. या ठिकाणी असणाऱ्या दुकानांमध्ये तुम्हाला 10 रुपयांपासून मातीच्या वस्तू मिळतील.

साड्यांच्या कपड्यांनी बनवलेल्या ड्रेसची करायचीय खरेदी? 

कुंभारवाड्यात गेलो तर मातीच्या भांड्यांचे असंख्य प्रकार पहायला मिळतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. 10 ते 500 रुपयांपर्यंत या वस्तूंची किंमत आहे. इथं चक्क 10 रुपयाला चहाचा कप आणि 200 रुपयाला मोठी कढई मिळते.

advertisement

एखाद्या शो रुममध्ये किंवा ऑनलाईन या वस्तूंची किंमत बरीच आहे. पण तुम्हाला कुंभारवाड्यात ही वस्तू स्वस्त दरात हवी तशी आणि नीट तपासून घेता येईल. त्याचबरोबर मातीच्या भांड्यांमध्ये काही भेसळ तर नाही ना, किंवा त्यात पीओपी- प्लास्टर ऑफ पेरिस तर मिसळलेलं नाही ना हे तुम्ही नीट तपासून पाहू शकता.

मातीच्या भांड्यामध्ये फक्त माठ नाही तर पाण्याची बाटली, कढई, तवा, दिवे, ग्लास, कप, असे अनेक पर्याय इथं आहेत.   तुमच्या किचनमध्ये जास्त टिकाऊ आणि स्वस्त भांडी हवी असतील तर मातीची भांडी तुम्ही नक्कीच घेऊ शकता.अशी मी माहिती दुकानाचे दुकानदार यांनी दिली.

advertisement

मोदकापासून ते पिझ्झा वेगवगेळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचाय? पुण्यातील बेस्ट 7 ठिकाणं

आधुनिक किचनमध्ये मातीच्या भांड्यांचा थाट वाढतो आहे. वाटी, पातेले आदींपासून ते तवा, माठ यांच्या किमती शंभर रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत आहेत. आता पुन्हा एकदा घराघरात मातीची भांडी दिसू लागली आहेत. मातीचा तवा, हंडी, कडई, कुकर अशा वस्तू विविध आकारांड आणि लाल आणि काळ्या रंगांत बाजारात उपलब्ध आहेत. मोठमोठ्या प्रदर्शनामध्येही ती हमखास पाहण्यास मिळतात. 100 रुपयांपासून दीड हजारांपर्यंत ही मातीची भांडी खरेदी करता येतात.

advertisement

मातीच्या भांड्यांच्या खरेदीत गेल्या तीन वर्षांत सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच या भांड्यांचा योग्य प्रकारे वापर केल्यास ती 7 ते 8 वर्षे टिकतात. जुनी जाणती मंडळी आजही मातीच्या भांड्यात जेवण बनवणं पसंत करतात. अशी माहिती यावेळी त्यांनी दिली

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
फक्त 10 रुपयांपासून मिळतील घर सजावटीच्या हटके वस्तू, पुण्यातल्या ‘या’ ठिकाणी करा खरेदी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल