फटाक्यांचा धूर आणि धूळ यामुळे विषारी कण हवेत इतके उंच वाढू शकतात की काही लोकांना श्वास घेणे कठीण होते. ही विषारी हवा केवळ फुफ्फुसांवरच नाही तर त्वचेवर आणि डोळ्यांवरही परिणाम करते. दिवाळीनंतरच्या प्रदूषणाचा त्रास कमी करण्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवा. या टिप्स घरातल्या सर्व सदस्यांसाठी उपयुक्त ठरतील.
Diwali : दिवाळी फराळाचा ओव्हरडोस पडेल भारी, या उपायांनी पोटाला मिळेल आराम
advertisement
काढा - प्रदूषणामुळे शरीरात विविध संसर्ग होण्याचा धोका वाढतो. म्हणून, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणं अत्यंत महत्वाचं. काढा बनवण्यासाठी, एक ग्लास पाणी गरम करा आणि त्यात तुळशीची पाच ते सहा पानं घाला. नंतर, आलं किसून घाला आणि थोडा गूळ घाला. मिश्रण अर्ध होईपर्यंत उकळा, नंतर ते पूर्णपणे गाळून घ्या.
यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल.
हळदीचं दूध - हळदीतली अनेक पोषक तत्वं आणि गुणधर्म शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जातात. प्रदूषणापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी हळदीचं दूध पिऊ शकता. एक ग्लास दुधात कच्ची हळद किंवा हळद पावडर मिसळा आणि ते चांगलं उकळून घ्या. हे दूध दररोज नियमितपणे पिणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.
Skin Care : घरगुती फेसमास्क करतील जादू, कोरडी त्वचा दिसेल मुलायम
योग आणि व्यायाम करा - दिवाळीत आणि नंतर होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास टाळण्यासाठी, नियमितपणे योग आणि व्यायाम करायला सुरुवात करा. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होईल आणि शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढेल.
स्वतःला हायड्रेटेड ठेवा - प्रदूषणापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी हायड्रेटेड राहणं अत्यंत महत्वाचं आहे. डिहायड्रेशन टाळण्यासाठी नियमितपणे पाणी प्या. याशिवाय नियमितपणे रस, नारळ पाणी आणि सूप देखील घेऊ शकता.