Diwali : दिवाळीतल्या भरपेट फराळानंतर पोटासाठी उपयुक्त टिप्स, उपायांमुळे पोट येईल ताळ्यावर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
दिवाळीत जास्त तळलेले, गोड पदार्थ खाल्ले की अनेकदा आम्लपित्त, अपचन, छातीत जळजळ आणि पोटफुगी होते. दिवाळीत खूप तळलेलं अन्न खाल्लं असेल आणि आता आम्लपित्तचा त्रास होत असेल तर काही सोपे आणि घरगुती उपाय लक्षात ठेवा.
मुंबई : दिवाळीतला भरपूर फराळ शिवाय मिठाई या सगळ्यामुळे पोटावर ताण येतो. कारण फराळासोबत इतरही पदार्थ खाल्ले जातात. विविध मिठाया, पदार्थ, भजी, समोसे असे पदार्थ मित्रमंडळी आणि कुटुंबीयांसोबत असताना जास्त खाल्ले जातात.
दिवाळीत जास्त तळलेले, गोड पदार्थ खाल्ले की अनेकदा आम्लपित्त, अपचन, छातीत जळजळ आणि पोटफुगी होते. दिवाळीत खूप तळलेलं अन्न खाल्लं असेल आणि आता आम्लपित्तचा त्रास होत असेल तर काही सोपे आणि घरगुती उपाय लक्षात ठेवा.
गरम आलं-लिंबू घालून चहा - आलं पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर मानलं जातं. त्यातील जिंजरोल्स आणि शोगाओल्स हे घटक पोटातील वायू कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी उपयुक्त आहेत. लिंबातलं व्हिटॅमिन सी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं. एक कप पाण्यात एक इंचाचा आल्याचा तुकडा उकळा. गाळून घ्या आणि त्यात अर्धा लिंबू पिळून घ्या. चवीनुसार एक चमचा मध घाला आणि घोट घोट करून प्या. या चहामुळे पोटातील जळजळ कमी होईल आणि जडपणा कमी होईल.
advertisement
थंड दूध - दुधात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, यामुळे पोटातील अतिरिक्त आम्ल शोषून घेतलं जातं आणि त्वरित आराम मिळतो. थंड दूध नैसर्गिक अँटासिड म्हणून काम करतं. साखरेशिवाय हळूहळू एक ग्लास थंड दूध प्या. दूध थंड असलं पाहिजे कारण गरम दुधामुळे आम्लता वाढू शकते. लैक्टोजचा त्रास होत असेल, तर हा उपाय खूप प्रभावी ठरेल.
advertisement
बडीशेप आणि खडी साखर - पचनाच्या समस्यांवर बडीशेपेचा वापर केला जातो. यामुळे पोटातील पेटके कमी होतात. यामुळे गॅस कमी होतो आणि मुख दुर्गंधी कमी होते. खडी साखर नैसर्गिकरित्या थंड असल्यानं जळजळ कमी होते. जेवणानंतर बडीशेप खाल्ल्यानं पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. एक चमचा बडीशेप आणि एक चमचा साखरेचा रस तोंडात ठेवा आणि हळूहळू चावा. बडीशेप आणि खडी साखर बारीक करून पावडर करा आणि एक चमचा पावडर पाण्यासोबत घ्या.
advertisement
लवंग - लवंगेतल्या युजेनॉलमुळे पोटातील वायू आणि आम्लता कमी होते. यामुळे पाचक घटक देखील वाढतात.
एक किंवा दोन लवंग चघळा. लवंगाचा रस हळूहळू पोटात गेल्यानं आराम मिळेल. लवंग बारीक करून पावडर देखील बनवू शकता.
हलके आणि साधे पदार्थ खा - दिवाळीनंतर पुढचे एक-दोन दिवस हलके, कमी मसालेदार आणि साधे पदार्थ खा. डाळ आणि भात, खिचडी किंवा दलिया यासारखे पदार्थ खा.
advertisement
भरपूर पाणी प्या - हायड्रेटेड राहणं अत्यंत महत्वाचं आहे. पुरेसं पाणी प्यायल्यानं विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पचन सुधारतं.
चलन वलन - जेवणानंतर चालण्यानं पचन सुधारतं. चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स आणि अल्कोहोल टाळा, कारण यामुळे अॅसिडिटी वाढू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 20, 2025 7:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali : दिवाळीतल्या भरपेट फराळानंतर पोटासाठी उपयुक्त टिप्स, उपायांमुळे पोट येईल ताळ्यावर








