केसांच्या समस्येवरचं हे तेल घरी तयार करता येतं. तेल बनवण्यासाठी कोरफडीची दोन पानं, नारळाचं तेल एक कप, कडुनिंबाची पानं, कडीपत्ता हे साहित्य तेल बनवण्यासाठी आवश्यक आहे.
Vitamin D : व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता, पुरुषांमधे जाणवणात हे बदल, वेळीच व्हा सावध
मॅजिक ऑईल बनवण्यासाठी, कोरफडीच्या दोन पानांचे लहान तुकडे करा, त्यांची बारीक पेस्ट बनवा आणि नंतर या पेस्टमधे एक कप नारळाचं तेल, कडुनिंबाची काही पानं आणि थोडा कडीपत्ता घाला आणि पाच मिनिटं ढवळा.
advertisement
थंड झाल्यावर ते एका भांड्यात गाळून साठवा.
दररोज रात्री झोपण्यापूर्वी केसांना हे तेल लावा आणि हलक्या हातानं मसाज करा. त्यानंतर सकाळी कोमट पाण्यानं केस धुवा. सात दिवस असं केल्यानं केस तुटणे, केस गळणे आणि पांढरे होणं थांबेल.
Drinking Water : एका दिवसात किती पाणी प्यावं ? शरीर विज्ञान काय सांगतं ?
कोरफडीत दाहक-विरोधी गुणधर्म आणि केसांच्या वाढीला चालना देणारे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे घटक केसांना हायड्रेटेड देखील ठेवताच. दरम्यान, नारळाच्या तेलातले पोषक घटक असतात मजबूत आणि निरोगी केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात.
केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी नारळाचं तेल खूप फायदेशीर मानलं जातं. कडुनिंब आणि कडीपत्त्यातल्या पोषक घटकांमुळे केसांची चांगली वाढ होते आणि केस मजबूत होतात.
