पलामू, 29 नोव्हेंबर : तुळशीच्या लग्नानंतर शुभकार्यांना सुरुवात झाली आहे. वर्ष संपेपर्यंत लग्नासाठीदेखील अनेक मुहूर्त आहेत. त्यामुळे आता घराघरात लग्नसराई सुरू झाली आहे. तुमचं लग्न असेल किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकाचं लग्न असेल, तर आतापासून तयारीला लागा. सुदृढ आहार घ्या, 8 तासांची चांगली झोप घ्या, म्हणजे चेहऱ्यावर छान नैसर्गिक तेज येईल. शिवाय त्वचेची, केसांची काळजी घेण्यासाठी काही घरगुती उपाय करायलाही हरकत नाही. आज आपण पिंपल घालवून चेहरा तुकतुकीत कसा करायचा यासाठी एक रामबाण उपाय पाहणार आहोत.
advertisement
आपल्याला फार काही करायचं नाहीये, तर केवळ कडुलिंबाची पानं वाटून त्यात मुलतानी माती आणि चिमूटभर हळद मिसळून एक पॅक तयार करायचाय. दररोज रात्री हा पॅक लावा, 20 मिनिटं ठेवा आणि साध्या पाण्याने चेहरा धुवून घ्या. असं केल्यास जवळपास आठवड्याभरात आपल्या चेहऱ्यावरून पिंपल आणि डाग दोन्ही गायब होतील. परंतु लक्षात घ्या, प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगळी असते. त्यामुळे चेहऱ्यावर काहीही लावण्यापूर्वी ते आधी कानामागे लावून पाहा. जर तिथे काही अॅलर्जी आली नाही, तर मग तुम्ही ते चेहऱ्यावर लावू शकता.
कोंडा आणि केस गळती मुळे त्रस्त आहात? हिवाळ्यात घरगुती पद्धतीनं अशी घ्या केसांची काळजी Video
तुमच्या चेहऱ्यावर एकही पिंपल किंवा डाग नसेल पण तरीही चेहरा फ्रेश वाटत नसेल, स्किनवर ग्लो नसेल, तर तांदूळ वाटून त्यात अर्धा चमचा हळद, एक चमचा दही तुमची स्किन ड्राय असेल तर त्यात मध मिसळा आणि ऑयली असेल तर त्यात लिंबू पिळा आणि हा लेप चेहऱ्यावर लावा. छान मालिश करा आणि अर्ध्या तासाने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर मॉइश्चरायझर लावा. यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक ग्लो येईल.
PHOTOS : चांदीपासून बनवलेल्या या हँडबॅग, महिलांना करतायेत आकर्षित, किंमत किती?
दरम्यान, कडक उन्हात चेहरा अतिशय निस्तेज होतो. त्यामुळे कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमाआधी काही दिवस उन्हात जाणं जरा टाळा. शिवाय तुम्ही बिट वाटून त्यात गुलाबपाणी मिसळून दररोज चेहऱ्यावर लावू शकता. 15 ते 20 मिनिटं हा लेप लावल्यास हळूहळू निस्तेजपणा दूर होईल.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g