कोंडा आणि केस गळती मुळे त्रस्त आहात? हिवाळ्यात घरगुती पद्धतीनं अशी घ्या केसांची काळजी Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
हिवाळ्यामध्ये आपले केस ड्राय आणि निस्तेज दिसायला लागतात. घरगुती पद्धतीनं केसांची काळजी कशी घ्यावी पाहा
छत्रपती संभाजीनगर, 29 नोव्हेंबर : हिवाळा सुरू झालेला आहे हिवाळ्यामध्ये आपण आपल्या त्वचेची काळजी घेत असतो. पण त्यासोबतच आपण आपल्या केसांची काळजी सुद्धा घ्यायला हवी कारण हिवाळ्यामध्ये आपले केस ड्राय आणि निस्तेज दिसायला लागतात. कोंडा पण भरपूर प्रमाणात होतो त्यामुळे केस गळती सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे हिवाळ्यात घरगुती पद्धतीनं केसांची काळजी कशी घ्यावी याबद्दलच छत्रपती संभाजीनगरमधील ब्युटिशियन दर्शना देशमुख यांनी माहिती दिली आहे.
कशी घ्यावी केसांची काळजी?
आपण जर नॉनव्हेज खात असाल तर ते आपल्या केसांसाठी देखील चांगला असतं. तर सर्वप्रथम आपण एक अंड घ्यायचं. त्या अंड्यामधला पिवळा गर बाजूला काढून जो पांढरा गर असतो तो आपण मेहंदीमध्ये मिक्स करून आपल्या केसांना जर लावला तर आपले केस छान सिल्की होतात. त्याचबरोबर कोंडा होत नाही आणि केस गळती सुद्धा कमी होते. हा घरगुती उपाय आपण करू शकतो, अशी माहिती दर्शना देशमुख सांगतात.
advertisement
तीळ खा अन् रोगमुक्त व्हा, हिवाळ्यातील फायदे माहितीये का?
त्याच बरोबर विटामिन ईची गोळी घ्यायची ती गोळी आणि एलोवेरा जेल हे एकत्र करून हे मिश्रण जर आपण आपल्या केसांना लावलं तर आपले केस आहे छान सिल्की होतात आणि वाढ देखील व्हायला मदत होते. तुम्ही तुमच्या केसांसाठी घरगुती तेल सुद्धा तयार करू शकता तर हे तेल तयार करण्यासाठी एक कांदा घ्यायचा काळे तीळ, थोडे मेथीचे दाणे आणि कोणतेही तेल जे तुम्ही वापरत असाल ते. हे सगळं मिश्रण तेला मध्ये टाकायचं आणि हे गॅस वरती तेल लाल होईपर्यंत उकळून घ्यायचं. नंतर ते गाळून घ्यायचं. दर दोन दिवसाला हे तेल लावून केसांची छान मालिश करून घ्यायची आणि त्यानंतर केस धुतले तर तुमचे केस एकदम सुंदर आणि छान होतात, असं दर्शना देशमुख सांगतात.
advertisement
हिवाळ्यात सांधेदुखीवर रामबाण इलाज; एक पदार्थ खा, सर्व दुखणी होतील दूर
दही हे सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतं तर ते दही आपण जर आपल्या केसांना लावलं आणि त्यानंतर तुम्ही केस धुतले तर तुमचे केस हे छान होतात. वाढ देखील व्हायला मदत होते. हे सर्व घरगुती उपाय जर तुम्ही ट्राय केले तर तुमचे केस चांगले व्हायला आणि वाढायला मदत होईल, असंही दर्शना देशमुख सांगतात.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
November 29, 2023 2:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
कोंडा आणि केस गळती मुळे त्रस्त आहात? हिवाळ्यात घरगुती पद्धतीनं अशी घ्या केसांची काळजी Video