तीळ खा अन् रोगमुक्त व्हा, हिवाळ्यातील फायदे माहितीये का?

Last Updated:

हिवाळ्यात तीळ खाणं आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असतं असं आहार तज्ज्ञ सांगतात.

+
हे

हे खा अन् रोगमुक्त व्हा, थंडीच्या दिवसात तीळ खाण्याचे फायदे माहितीये का?

छत्रपती संभाजीनगर, 18 नोव्हेंबर : थंदीच्या दिवसांत तीळ खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. तिळात उष्णता असते आणि त्यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. विविध पदार्थांच्या माध्यमातून तीळ आपण खाऊ शकतो. पण तीळ खाण्याचे प्रमाण किती असावे? आणि निरोगी जीवनासाठी किती प्रमाणात तीळ खावेत? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
कधी खावेत तीळ?
तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खनिजे आहेत. कॅल्शियम मॅग्नेशियम, फॉस्फरस देखील तिला मध्ये मोठ्या प्रमाणात आहे. हे घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतात. बऱ्याच लोकांना असा गैरसमज असतो की त्यामध्ये भरपूर उष्णता आहे. तर त्यामध्ये भरपूर उष्णता आहे पण जर त्याचा अतिरेक सेवन केलं तरच याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो.
advertisement
आपण जर व्यवस्थित प्रमाणात तीळ खाल्ले तर त्याचा कोणताही दुष्परिणाम आपल्या शरीरावर होत नाही. हाडांचे दुखणे, हाडांची वाढ, हाडांची झीज यासाठी जर कुठला घटक गरजेच असेल तर तो तीळ हा आहे. साठी रोज एक चमचा तरी तीळ खाणं गरजेचं आहे. पण हे तीळ भाजून खावेत. तसेच सोबत समप्रमाणात जवस घेतलं तर हाडांचे दुखणे कमी होते, असं आहार तज्ज्ञ सांगतात.
advertisement
रोज खा एक चमचा तीळ
तुम्ही कॅल्शियमची गोळी घेत असाल तर दररोज तुम्ही एक चमचा तीळ खाल्ले तर तुम्हाला गोळी घेण्याची गरज सुद्धा पडणार नाही. तसंच घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी नॅचरल पद्धतीने तीळ हे दररोज एक चमचा खायलाच हवेत. तिळाचं तेल देखील असतं. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई आहे. हे आपल्या रक्तवाहिनीसाठी गरजेचं असतं, असंही कर्णिक यांनी सांगितलं.
advertisement
या रुग्णांसाठी तीळ उपयुक्त
तीळ हे आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी, रक्तवाहिन्या चांगला ठेवण्यासाठी व आपल्या त्वचेसाठी देखील उपयुक्त आहेत. कढीपत्त्याचे पान छान फ्राय करून त्यामध्ये तीळ टाकून जर तुम्ही जेवणानंतर किंवा नाश्ता नंतर एक एक चमचा घेतलं तर तुम्हाला बाहेरून कोणतेही कॅल्शियमची गोळी घेण्याची गरज पडणार नाही. वयात आलेल्या मुली, रुजोनिवृत्तीत असलेल्या महिला, मधुमेह आणि हृदयरोगी, त्याचबरोबर त्वचा रोगांसाठी देखील तीळ अत्यंत उपयुक्त आहेत, असं कर्णिक सांगतात.
advertisement
काळे तीळ आणि पांढरे तीळ दोन्हीही आपल्याला तेवढेच उपयुक्त घटक हे देतात. ज्यांना संधिवात आहे किंवा हाडांच्या तक्रारी आहेत अशा लोकांनी तिळाचे सेवन केलं तर अत्यंत उपयुक्त ठरतं. त्यासोबतच काळे तीळ भिजवून किंवा भाजून कढीपत्त्यासोबत खावीत. किंवा पत्ता कोबीची पानं शिजवून त्यात तीळ टाकून खाल्ले तर तुम्हाला खूप फायदा होतो, असंही कर्णिक सांगतात.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
तीळ खा अन् रोगमुक्त व्हा, हिवाळ्यातील फायदे माहितीये का?
Next Article
advertisement
Gold Silver Price Today : सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...
  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

  • सामान्य ग्राहकांना दिलासा! सोनं-चांदीच्या दरात घसरण, पटापट चेक करा आजचा दर...

View All
advertisement