चेहरा प्रसन्न वाटावा म्हणून अनेक उत्पादनांचा वापर केला जातो, पण याचा दुष्परिणाम त्वचेवर जाणवतो. या संदर्भात, आयुर्वेदिक डॉक्टर निशांत गुप्ता यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी सोप्या पद्धतीनं बनवता येईल अशा क्रीमची माहिती दिली आहे.
Eye Care : डोळे चोळण्याची छोटी सवय ठरू शकते धोकादायक, वाचा कारणं आणि परिणाम
advertisement
चेहरा स्वच्छ, नितळ दिसावा यासाठी कोरफडीचा गर, व्हॅसलीन, दोन चमचे ग्लिसरीन किंवा बेबी ऑइल असं साहित्य आवश्यक आहे. हे क्रिम दररोज वापरल्यानं पंधरा दिवसांत त्वचा उजळ होईल आणि हे क्रिम घरी बनवणं सोपं आहे.
क्रिम बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कोरफडीचा गर, व्हॅसलीन, दोन चमचे ग्लिसरीन किंवा बेबी ऑइल. क्रिम बनवण्यासाठी कोरफडीच्या ताज्या गरात, थोडं व्हॅसलीन आणि दोन चमचे ग्लिसरीन किंवा बेबी ऑइल मिसळा. क्रिम तयार आहे.
Kidney Health : मूत्रपिंडांची हानी रोखा, आतापासूनच बदला या सवयी, वाचा सविस्तर
हे क्रिम वापरायला खूप सोपं आहे. दररोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. रात्रभर तसंच राहू द्या आणि सकाळी चेहरा धुवा. सर्वोत्तम परिणामांसाठी, हा उपाय सलग पंधरा दिवस करा. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी कोरफड खूप फायदेशीर आहे. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते आणि मुरुमांपासूनही आराम मिळतो. याशिवाय, चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी देखील ते खूप फायदेशीर मानले जाते.
