तुम्हालाही रोज अशाच पोटाच्या समस्यांमुळे त्रास होत असेल, तर डॉक्टरांनी सुचवलेल्या घरगुती पेयाबद्दलची ही माहिती. यामुळे पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो आणि चयापचयाचा वेग वाढतो. हे पेय फक्त 3 मसाले वापरून तयार केलं जाऊ शकतं. पोट फुगण्याच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी हे मिश्रण खूपच उपयुक्त आहे. फुगण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी, बडीशेप, जिरं आणि ओवा मिक्स करुन पेय तयार केलं जातं. हे पेय तयार करण्यासाठी, 400 ते 500 मिली पाणी घ्या. या पाण्यात एक चमचा जिरं, बडीशेप आणि ओवा घाला. हे मिश्रण रात्रभर तसंच ठेवा. हे पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी थोडंसं गरम करून प्या. हे पेय पोट फुगण्याच्या समस्येबरोबरच, आतड्यांसाठीही उपयुक्त आहे. यामुळे भूक वाढते, आणि पचनही सुधारतं.
advertisement
Tips for a Good Day - सकाळी या 5 गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, या सवयी तुमचा मूड ठेवतील चांगला
बडीशेपच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे शरीराचं अनेक प्रकारे रक्षण होतं.
त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि शरीराला फायदेशीर दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. याशिवाय बडीशेप शरीराला डिटॉक्स करण्यात मदत करते. जिऱ्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जिरं खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
ओवा हा पचनासाठी सर्वोत्तम मानला जातो. ओवा हा फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वं आणि
खनिजांचा चांगला स्रोत आहे. ओव्याचं सेवन पचनासाठी फायदेशीर आहे आणि त्यामुळे
कोलेस्ट्रॉलची पातळी देखील सुधारते.