Tips for a Good Day - सकाळी या 5 गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, या सवयी तुमचा मूड ठेवतील चांगला

Last Updated:

आपल्या शरीरासाठी झोप जितकी महत्त्वाची तितकीच दिवसाची सुरुवातही..असं म्हणतात की सकाळची सुरुवात चांगली झाली नाही तर दिवसभर मूड खराब राहतो. दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी काही टिप्स

(योग दिवस)
(योग दिवस)
मुंबई : आपल्या शरीरासाठी झोप जितकी महत्त्वाची तितकीच दिवसाची सुरुवातही..असं म्हणतात की सकाळची सुरुवात चांगली झाली नाही तर दिवसभर मूड खराब राहतो. पण सकाळची सुरुवात चांगली झाली तर दिवसभर मूड चांगला राहतो. थोडक्यात सकाळची सुरुवात चांगली झाली तर संपूर्ण दिवस सकारात्मक जातो. अशावेळी काही गोष्टी नियमितपणे केल्या तर तुमच्या दिवसाची सुरुवात तर चांगली होईलच पण दिवसभर तुमचा मूडही चांगला राहील.
नैसर्गिक प्रकाशाला प्राधान्य  -
सकाळी नैसर्गिक प्रकाशात काही वेळ घालवल्यामुळे तुमचा मूड चांगला राहतो. काही मिनिटं जरी
सूर्यप्रकाशात बसलात तरी तुम्हाला बरं वाटेल. सूर्यप्रकाश आपल्या आरोग्यासाठी चैतन्यदायी असतो. त्यामुळे, दिवसाची सुरुवात उत्साहात होईल.
थंड पाण्यानं स्नान -
advertisement
संध्याकाळी घरी परतल्यावर गरम पाण्यानं आंघोळ केली तर शरीराचा थकवा निघून जातो, पण सकाळी थंड पाण्यानं आंघोळ केली तर फ्रेश वाटतं. थंड पाण्यानं आंघोळ केल्यामुळे उत्साह जाणवतो आणि दिवसभर मूड चांगला राहतो.
नाश्ता -
चांगला नाश्ता केला तर तुम्हाला दिवसभर उत्साही वाटतं, आणि तुमचा मूडही चांगला राहतो. तुम्ही खात असलेल्या पदार्थांची गुणवत्ता चांगली नसेल तर पोट खराब होऊ शकतं. त्यामुळे दिवसाची सुरुवात करताना तुम्ही काय खाता यावर तुमचा दिवस अवलंबून असतो.
advertisement
सक्रिय राहा -
तुम्ही सकाळी 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी ठेवा आणि सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा. सकाळी व्यायाम,
योगासनं किंवा नृत्य केल्यानं शरीर तंदुरुस्त राहतं. यामुळे मिळणारी ऊर्जा तुमचा मूड दिवसभर चांगला राहण्यासाठी उपयुक्त आहे. सकाळी गाणी ऐकल्यानं तुमचा मूडही सुधारू शकतो. तुमची आवडती गाणी ऐकून तुम्हाला छान वाटतं. या म्युझिक थेरपीनं तुम्हाला प्रसन्न वाटेल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tips for a Good Day - सकाळी या 5 गोष्टींनी करा दिवसाची सुरुवात, या सवयी तुमचा मूड ठेवतील चांगला
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement