संपूर्ण साडी नेसून झाल्यावर पदराचं एक टोक जरी बाहेर आलं तरी संपूर्ण मेहनत वाया गेल्याचं फिलिंग येतं. आता परत पदर सोडावा लागणार, पुन्हा प्लेटिंग करावी लागणार असं वाटतं. आधीच इतक्या मेहनतीने साडी नेसलो, इतका वेळ गेला. आता संपूर्ण साडी नीट आहे फक्त पदराच्या एक टोकासाठी पुन्हा वेळ नाही. पण डोंट वरी. आम्ही तुम्हाला आता अशी ट्रिक दाखवणार आहोत की पदर पुन्हा न काढता तुम्ही साडीचं हे बाहेर आलेलं टोक किंवा प्लेट फिक्स करू शकता.
advertisement
ऑफिसमध्ये महिलांनाच थंडी का लागते, पुरुषांना का नाही? संशोधनातून समोर आलं कारण
अगदी सोपी आणि साधी अशी ही पद्धत आहे. तुम्हाला करायचं काय आहे तर पदराची जे प्लेट बाहेर आली आहे त्याच्या वरच्या प्लेट मानेच्या दिशेने फोल्ड करून घ्या. आता जी प्लेट बाहेर आली आहे. ती आतल्या बाजूने फोल्ड करा आणि त्यावर सेफ्टी पिन लावा. आता त्याच्या वरच्या प्लेट ज्या आपण मानेच्या दिशेने दुमडल्या होत्या त्या पुन्हा या पदरावर सोडा. तुम्ही स्वतःच पाहाल की ते बाहेर आलेलं टोक आत गेलं, बिलकुल दिसत नाही आहे.
युट्युब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. तुम्ही ही ट्रिक ट्राय करून पाहा आणि कशी वाटली आम्हाला नक्की सांगा. तुम्ही अशी प्लेट बाहेर आल्यावर काय करता, तुमच्याकडे काही फॅशन जुगाड असेल तर तोसुद्धा आम्हाला नक्की सांगा.