पण तुम्हाला माहिती आहे का की विनातेलातही पुऱ्या बनवता येतात आणि त्या चवीला पण छान लागतात? चला हे कसं बनवायचं जाणून घेऊ.
हेल्दी विना तेलातल्या पुऱ्या कशा बनवायच्या?
पिठ मळा:
1-2 कप गव्हाचं पीठ किंवा मैदा घ्या. त्यात मीठ, 2 मोठे चमचे आंबट दही आणि पाणी टाकून घट्टसर पिठ मळा. नंतर ते पिठ सुती कपड्याने झाकून अर्धा तास ठेवा.
advertisement
तेलाऐवजी पाणी:
कढईत तेलाऐवजी अर्धा कप पाणी घाला आणि उकळी आणा. पूऱ्या लाटून घ्या आणि त्या उकळी आलेल्या पाण्यात सोडा आणि 2-3 मिनिटं शिजवा. जेव्हा पूरी वर तरंगू लागेल तेव्हा बाहेर काढा.
एअर फ्राय:
या पूऱ्या नंतर एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये ठेवा आणि 200°C वर 5 मिनिटं एअर फ्राय करा. (एअर फ्रायर नसल्यास ऑनलाइन किंवा होम अप्लायंसेस स्टोअरमध्ये मिळतो.)
फायदे
तेलाचा वापर नाही - कमी कॅलरी
डायबेटिस, लठ्ठपणा असणाऱ्यांसाठीही सुरक्षित
नेहमी खाता येईल - तेलामुळे महिन्यातून एकदाच खाण्याची मर्यादा नाही
अशा प्रकारे तुम्ही बिनातेल पूड्या करून घरच्यांना खाऊ घालू शकता, आणि चवीत फारसा फरकही जाणवत नाही.