मुलांच्या सोबत बसून एकत्र जेवण करा :
लहान मुलांची मोबाईल पाहून जेवायची सवय मोडायची असेल तर पालकांनी देखील त्यांच्यासोबत बसून जेवावे. यामुळे मुलांना पालकांचं पूर्ण अटेंशन मिळत. तसेच मुलं सोबत असताना मोबाईल वापरण्याची सवय पालकांनी देखील सोडायला हवी. कारण अनेकदा पालकांच्या हातातील मोबाईल पाहूनच मुलं मोबाईल पाहण्याचा हट्ट करतात. मुलांचे मोबाईल ऍडिक्शन सोडवायचे असेल तर त्यांच्या हातून फोन हिसकावून घेऊ नका, तर हळूहळू त्यांची सवय सुटेल यासाठी प्रयत्न करा.
advertisement
मुलांशी बोलतं राहा :
मुलांना टीव्ही आणि मोबाईलच्या ऍडिक्शन पासून दूर ठेवायचे असेल तर तुम्ही जेवण भरवताना त्याच्याशी बोलत राहा. जर मुलं थोडी मोठी असतील तर त्यांच्याशी शाळेतील गप्पा मारा किंवा त्यांच्या आवडत्या गोष्टीविषयी त्यांच्याशी संवाद साधा. यामुळे मुलं सतत फोनकडे पाहणार नाहीत आणि हळूहळू त्यांची ही सवय सुटेल.
या टिप्स सुद्धा येतील कामी :
जेवत असताना टीव्ही किंवा मोबाईल लहान मुलांसमोर अजिबात आणू नका.
मुलांचे आवडते व्यंजन बनवा जेणेकरून त्यांचं पूर्ण लक्ष हे खाण्याकडे राहील.
मुलांना मोबाईलमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जागरूक करा.
मुलांना अट घाला की मोबाईल त्यांना मिळेल पण जेवताना त्याचा वापर अजिबात करायचा नाही.
