TRENDING:

Melon : फक्त 2 बोटांची ट्रिक, खरबूज कापण्याआधीच कळेल ते गोड आहे की नाही

Last Updated:

पैसे देऊनही पदरी निराशा पडू नये, असं तुम्हाला वाटतंय का? प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर ‘डेकोर दीदी’ यांनी शेअर केलेल्या काही खास ट्रिक्स वापरून तुम्ही न कापताच 100% गोड खरबूज निवडू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्याचा कडाका वाढला की, गल्लीबोळातील रसवंती गृहं आणि फळांच्या गाड्यांवर लोकांची गर्दी वाढू लागते. रखरखत्या उन्हात शरीराला आतून थंडावा देण्यासाठी आपण कलिंगड आणि खरबुजासारख्या रसाळ फळांचा आधार घेतो. खरबुजामध्ये साधारण 90 टक्के पाणी असल्याने ते शरीराला हायड्रेट तर ठेवतेच, पण ऊर्जाही देते.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

पण खरबूज खाण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा ते चवीला गोड आणि रसाळ असते. अनेकदा आपण बाहेरून पिवळेधमक दिसणारे खरबूज घरी आणतो, पण कापल्यावर ते आतून कच्चे किंवा फिकट निघते. पैसे देऊनही पदरी निराशा पडू नये, असं तुम्हाला वाटतंय का? प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर ‘डेकोर दीदी’ यांनी शेअर केलेल्या काही खास ट्रिक्स वापरून तुम्ही न कापताच 100% गोड खरबूज निवडू शकता.

advertisement

1. 'दोन बोटांचा' तो जादुई नियम

खरबूज निवडताना सर्वात आधी त्यावर असलेल्या नैसर्गिक रेषांकडे (धार्या) लक्ष द्या. जर या दोन रेषांच्या मध्ये किमान दोन बोटांचे अंतर असेल, तर समजावे की हे फळ वेलीवर नैसर्गिकरित्या पूर्णपणे पिकलेले आहे. अशा रेषांचे खरबूज कापल्यावर नेहमीच गोड आणि रसाळ निघते.

2. वजनाचा समतोल महत्त्वाचा

advertisement

आपल्याला वाटतं की जड खरबूज म्हणजे चांगलं, पण खरं तर याच्या उलट असू शकतं. जर एखादं खरबूज आकाराने मोठं असूनही वजनाला हलकं वाटत असेल, तर ते चांगलं पिकलेलं असतं. अशा फळात बिया कमी आणि गर जास्त असतो. याउलट, खूप जास्त जड वाटणारं खरबूज आतून कच्चं असण्याची शक्यता जास्त असते.

3. रंग आणि जाळीदार बनावट

advertisement

खरबुजाच्या सालीवर जर तपकिरी रंगाचं जाळं दिसत असेल, तर ते फळ अत्यंत गोड असण्याची खात्री असते. तसेच, गडद पिवळ्या रंगाचे खरबूज गोड असतात. जर खरबूज दिसायला एकदम गुळगुळीत, स्वच्छ आणि हिरवट असेल, तर ते विकत घेणं टाळा कारण ते चवीला फिकट निघू शकतं.

4. दाबून आणि वासावरून ओळखा

स्पर्श: खरबुजाला बोटाने हलके दाबून पाहा. जर ते किंचित दबले जात असेल, तर ते खाण्यासाठी तयार आहे. पण जर ते खूप जास्त पचपचीत लागत असेल, तर ते आतून सडलेले असू शकते.

advertisement

खरबुजाच्या देठाच्या बाजूने (Bottom) गोड आणि मंद सुवास येत असेल, तर ते रसाळ असण्याचे लक्षण आहे. जर देठाच्या भागात छिद्र असेल किंवा तो भाग काळा पडला असेल, तर असे फळ घेऊ नका.

केमिकलने पिकवलेलं कसं ओळखावं?

नैसर्गिकरित्या पिकलेल्या खरबुजाचा खालचा भाग नैसर्गिकरित्या गडद असतो. पण जर फळ चहूबाजूंनी एकसारखं पिवळं आणि अतिशय चमकदार दिसत असेल, तर समजावे की त्याला लवकर पिकवण्यासाठी रसायनांचा (Chemicals) वापर केला असण्याची शक्यता आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

पुढच्या वेळी बाजारात गेल्यावर केवळ रंगाला भुलू नका. या छोट्या पण प्रभावी टिप्स वापरून तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी सर्वात गोड आणि दर्जेदार खरबूज घरी आणू शकता.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Melon : फक्त 2 बोटांची ट्रिक, खरबूज कापण्याआधीच कळेल ते गोड आहे की नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल