जाणून घेऊयात कोणत्या शाकाहारी पदार्थातून तुम्ही प्रथिनं मिळवू शकता.
पालेभाज्या (Green Vegetables):
हिरव्या पालेभाज्या विशेषत: पालक आणि ब्रोकोलीत चांगल्या प्रमाणात प्रोटिन्स आढळून येतात. याशिवाय पालेभाज्यांमध्ये असलेली जीवनसत्वं, खनिजं, लोह आणि विविध पोषकतत्वं शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात.
संपूर्ण धान्ये (Whole Grains):
गहू, तपकिरी तांदूळ किंवा ब्राऊन राईस, ओटस, बार्ली, क्विनोआ अशा धान्यांमध्ये प्रथिनं चांगल्या प्रमाणात आढळून येतात. याशिवाय पूर्ण धान्यांमध्ये असलेल्या विविध पोषकतत्वांमुळे शरीराला विविध फायदे होतात. क्विनोआ मध्ये तर 9 अत्यावश्यक अमीनो ऍसिडने असतात. याशिवाय क्विनोआत इतर पूर्ण धान्यांपेक्षा प्रोटिन्सचं प्रमाण अधिक असतं.
advertisement
नट्स आणि विविध बिया (Nuts And Seeds):
बदाम, आक्रोड, अंबाडीच्या बिया, चिया सीड्स यात प्रथिनं, फायबर आणि हेल्दी फॅट्स चांगल्या प्रमाणात असतात. सुकामेवा किंवा दुधात ओट्स खाणं एक चांगला नाश्ता ठरू शकतं.
टोफू आणि टेम्पेह (Tofu and Tempeh):
टोफू आणि टेम्पेह ही सोयाबीन पासून बनलेली असल्याने यात प्रथिनं अधिक प्रमाणात असतात. वेगवेगळ्या पद्धतीने यांचा वापर आहारात करता येऊ शकतो.
सेटेन (Seitan) :
सध्या सेटेन फूडची जोरदार चर्चा सुरू आहे. ज्या व्यक्ती शाकाहारी आहेत आणि त्यांना चांगल्या प्रमाणात अन्नातून प्रथिनं हवी आहेत, अशांसाठी सेटेन फूड हा चांगला पर्याय आहे. पीठातून स्टार्च काढून टाकल्यानंतर उरतो तो ग्लुटेनयुक्त पदार्थ म्हणजे सेटेन. सेटेनमधून तुम्हाला प्रथिनं जरी मिळत असतील तरीही त्यात असलेल्या ग्लुटेनमुळे वजन वाढण्याची भीती आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच सेटेनयुक्त पदार्थांचं सेवन करावं.