हे सुद्धा वाचा : तुम्ही आहार कसा घेता यातच आहे वजन कमी करण्याचं सिक्रेट; या 5 चुका कधीही करू नका
जाणून घेऊयात जेवणाच्या योग्य वेळा कोणत्या ?
न्याहरी:
आहारतज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळी योग्य वेळी नाश्ता हा करायलाच हवा. सकाळी उठल्यानंतर 1 तासाच्या आत नाश्ता केल्याने चयापचय क्रिया सुधारून अन्न पचायला मदत होते. शिवाय शरीराला दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. मात्र तुम्ही जर सकाळी नाश्ता केला नाही तर तुमचं वजन वाढू शकतं. न्याहरीमध्ये अंडी, दही, ओट्स, कडधान्य किंवा फळं खाणं हा तुमच्यासाठी पूरक नाश्ता ठरू शकतो.
advertisement
हे सुद्धा वाचा : Lifestyle: या वेळी खाणं आरोग्यासाठी ठरु शकतं घातक, वेळीच व्हा सावध!
दुपारचं जेवण :
सकाळच्या नाश्त्यानंतर साधारणपणे 5 ते 6 तासांनी दुपारचं जेवणं करणं योग्य ठरतं. त्यामुळे तुम्ही सकाळी जर 8 च्या दरम्यान नाश्ता केला असेल तर 12.30 ते 1.30 च्या दरम्यान जेवण करणं योग्य ठरतं. दुपारच्या जेवणामुळे शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते. याशिवाय चयापचय संतुलित राहायला मदत होते. बऱ्याच संशोधनातून असं दिसून आलंय की, दुपारचं जेवण लवकर केल्याने वजन कमी व्हायला मदत होते. कारण दुपारी उशीरा जेवण केल्याने चयापचय क्रिया मंदावते त्यामुळे खाल्लेलं अन्न न पचल्याने वजन वाढण्याची भीती असते.
रात्रीचं जेवण :
तुमच्या झोपेच्या किमान 3 तास आधी रात्रीचं जेवण करणं गरजेचं आहे. जेणेकरून खाल्लेलं अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळेल. अनेकांना जेवल्यानंतर लगेच झोपायची सवय असते. मात्र असं करणं हे वजन वाढीला आमंत्रण ठरतं. रात्रीचं जेवण हलकं आणि पोषक असलं पाहिजे, ज्यामुळे खाल्लेलं अन्न सहज पचायला मदत होईल. कारण रात्री चयापचय क्रिया मंदावलेली असते. त्यामुळे रात्री कॅलरीज कमी बर्न होतात. त्यामुळे रात्रीच्या कमी आणि संतुलीत प्रमाणात घेणं हिताचं ठरतं. रात्री उशीरा जेवण्यापेक्षा फळं खाण्याच्या आणि दूध पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.