जाणून घेऊयात, केस मजबूत आणि रेशमी बनवण्यासाठीच्या काही खास टिप्स -
केस रेशमी दिसण्यासाठी काय करावं ?
सीरम आणि स्प्रे केसांना फक्त काही काळ रेशमी आणि चमकदार ठेवतात. परंतु जर तुम्हाला तुमचे केस नेहमीच चमकदार दिसायला हवे असतील तर केसांना तेल लावा. केसांना तेल लावून मसाज केल्यामुळे टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढतं, ज्यामुळे केसांच्या पेशींना चालना, ऊर्जा मिळते. यामुळे केस मजबूत होतात आणि केस लवकर वाढतात.
advertisement
Sleep routine tips : रात्री उशिरा झोपल्यानं होऊ शकतं नुकसान, चांगल्या झोपेसाठी करा हे उपाय
कडुनिंबाचे फायदे -
अनेक वेळा केस खूप कोरडे आणि निर्जीव दिसतात. यासाठी कडुनिंबाची पानं खूप फायदेशीर ठरतात.
कडुनिंबात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळे केस मजबूत चमकदार होतात. पाण्यात मूठभर कडुनिंब टाकून चांगलं उकळवा. उकळल्यानंतर पानं काढून त्यात थोडासा कोरफडीचा गर टाकून मिक्स करा. या
मिश्रणानं केस धुतले तर केस निर्जीव दिसत नाहीत आणि केस मऊ, मुलायम होतात.
Sitting risks : सतत बसून काम करता ? होऊ शकतो शरीरावर परिणाम, वेळीच व्हा सावध
आवळा पावडर
आवळा पावडर त्वचेसाठी तसंच केसांसाठी खूप चांगली मानली जाते. यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट पॉलीफेनॉल आणि टॅनिन आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. दह्यात एक चमचा आवळा पावडर मिसळा, त्यात एक चमचा मधही टाका. आता हे मिश्रण केसांच्या मुळांवर नीट लावा. 25 मिनिटं वाळवा. यानंतर केस पाण्यानं धुवा. यामुळे तुमचे केस गळणं देखील कमी होतं आणि तुमचे केस रेशमी आणि चमकदार बनतात.
अंडी आणि बदाम तेलाचे फायदे
केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी अंडी हा एक चांगला पर्याय आहे. त्यात व्हिटॅमिन ए आणि ई असतं, तसंच
बायोटिन आणि फोलेटने भरपूर असल्यानं केस चमकदार बनवण्यास मदत होते. हे मिश्रण बनवण्यासाठी एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग टाका, ते चांगलं मिसळा आणि त्यात थोडे बदाम तेल घाला. आता हे मिश्रण केसांना नीट लावा आणि तीस मिनिटं तसंच राहू द्या. यानंतर केस धुवा.
