जय महाराष्ट्र शॉपमध्ये उपलब्ध असलेल्या या कुर्त्यांमध्ये कॉटन, कॉटन सिल्क आणि इतर आरामदायक कापडांचा समावेश आहे. प्रत्येक कुर्त्याची डिझाईन रंगीबेरंगी आणि आकर्षक आहे ज्यामुळे सणाच्या दिवशी ती खूपच प्रभावी ठरू शकते. याशिवाय कुर्त्यांची साईज 36 ते 44 पर्यंत उपलब्ध असून त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार योग्य साईज निवडता येईल.
मुंबईत इथं नवरात्रीसाठी 40 डिझाईन्स, ज्वेलरी मिळतायत फक्त 100 रुपयांत!
advertisement
सणाच्या खरेदीला आणखी आकर्षक बनवण्यासाठी जय महाराष्ट्र शॉपमध्ये थ्री पीस सेट्स देखील विक्रीसाठी आहेत. या सेट्समध्ये कुर्ता, पायजामा आणि जॅकेट यांचा समावेश आहे आणि याची किंमत 1500 रुपयांपासून सुरू होते. यामध्ये 10 ते 15 विविध रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्धता आहे जे प्रत्येक ग्राहकाच्या रंगाची पसंती साधू शकतात. त्याचप्रमाणे खादी कुर्त्यांची रेंज देखील अत्यंत आकर्षक आहे. खादी कुर्ते 600 रुपयांपासून सुरू होतात.
या दुकानात 130 रुपयांपासून 1200 रुपयांपर्यंत कुर्त्यांची मोठी रेंज उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटनुसार सर्व प्रकारच्या कुर्त्यांची खरेदी करू शकता. जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर खरेदी करत असाल तर 300 रुपयांमध्ये मिळणाऱ्या कुर्त्यांना 250 रुपयांपर्यंत सुद्धा कमी किमतीत मिळवता येईल. यामुळे सणाच्या खरेदीला आणखी सोपे आणि फायदेशीर बनवता येईल.
तसेच लहान मुलांसाठी देखील आकर्षक पॅन्ट आणि कुर्ता सेट्स उपलब्ध आहेत ज्यामुळे मुलांसाठी देखील सणाची खरेदी सोपी होईल. या सेट्सची किंमत खूपच परवडणारी आहे. सर्व प्रकारच्या कुर्त्यांच्या, थ्री पीस सेट्स आणि खादी कुर्त्यांच्या या विशेष ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी दादर स्टेशनपासून केवळ 2 मिनिटांच्या अंतरावर स्थित जय महाराष्ट्र शॉप कबूतरखाण्याच्या अपोझिटला असून दादर डिपार्टमेंटचं पहिलंच दुकान आहे.