अनेकदा लोक 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी दरम्यान प्रवास करण्याचे नियोजन उशीरा करतात. परंतु तिकीट आणि हॉटेल बुकिंगच्या खर्चांमुळे ते शक्य होत नाही. अशा वेळी आयआरसीटीसीचे हे पॅकेज तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. कारण यात प्रवासाची संपूर्ण जबाबदारी आयआरसीटीसी घेते आणि ते बजेट-फ्रेंडली असते. आयआरसीटीसीने या वर्षी अंदमानसाठी खास टूर पॅकेज लॉन्च केले आहे. या पॅकेजमध्ये तुम्ही थेट अंदमानच्या नयनरम्य पोर्ट ब्लेअरमध्ये नववर्षाचा उत्सव साजरा करू शकता.
advertisement
पोर्ट ब्लेअर टूर पॅकेजची माहिती
भारतीय रेल्वेने नवीन वर्षासाठी खास 'WONDROUS ANDAMAN (NEW YEAR SPL) LTC' नावाचे टूर पॅकेज आणले आहे. या पॅकेजमध्ये तुमच्या प्रवासाची सुरुवात मुंबई येथून होईल. मुंबई ते पोर्ट ब्लेअरपर्यंतचा तुमचा प्रवास विमानाने होईल. तेथे तुम्ही पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक आणि नील बेटे एक्सप्लोअर करू शकता. या पॅकेजचा कालावधी 5 रात्री आणि 6 दिवसांचा असेल. प्रवासाची सुरुवात 30 डिसेंबर रोजी होईल.
पॅकेजची किंमत (प्रति व्यक्ती)
हे पॅकेज तुम्ही तुमच्या गरजेनुसार दोन किंवा तीन लोकांसाठी बुक करू शकता. तुम्ही दोन व्यक्ती सोबत प्रवास करणार असाल तर प्रतिव्क्ती 67,900 रुपये खर्च येईल आणि तुम्ही तीन जण सोबत प्रवास करणार असाल तर पॅकेजची किंमत थोडी कमी होते. तिघांच्या प्रवासासाठी प्रतिव्यक्ती 64,400 रुपये खर्च येईल. याशिवाय तुमच्यासोबत लहान मुल देखील प्रवास करणार असेल तर त्याच्यासाठी 56,200 मोजावे लागतील.
पॅकेजमध्ये मिळणाऱ्या प्रमुख सुविधा
या पॅकेजमध्ये प्रवासापासून ते राहण्यापर्यंत आणि खाण्यापिण्यापर्यंतच्या सर्व सुविधांचा समावेश आहे. मुंबईहून अंदमानला जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी विमानाचे तिकीट, प्रवासादरम्यान स्थलांतरासाठी एसी कोच असलेली कॅबची सुविधा, 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, संपूर्ण 5 दिवस नाश्ता आणि 5 दिवस रात्रीचे जेवण, सर्व पर्यटन स्थळांचे प्रवेश तिकीट हे सर्व पॅकेज फीसमध्येच असेल. तुमच्या सोयीसाठी हिंदी भाषिक टूर गाईडची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल.
या पॅकेजच्या माध्यमातून नववर्षाच्या स्वागताचा आनंद घेण्यासाठी तुम्ही भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून तिकीट बुकिंग करू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
