हलदोला येथील श्रीहरी मात्रे आणि जनार्दन मात्रे यांची शेतजमीन आहे. शेतजमिनीच्या रस्त्याबाबत त्यांचा शेजाऱ्यांशी वाद आहे. त्यांनी यासंदर्भात तहसील कार्यालयात अर्ज केले. यासंदर्भात नायब तहसीलदार हेमंत तायडे आणि अतुल बने यांनी पंचनामादेखील केला. मात्र, रस्त्याचा प्रश्न सुटला नाही.
शेवटी आईचं काळीज! आधी मुलगा, मग आई, सहा तासांत सगळं संपलं, सारं गाव हळहळलं
advertisement
शेतकऱ्याचा आरोप
रस्ता देण्यासाठी नायब तहसीलदार तायडे यांनी पैशांची मागणी केल्याचा आरोप शेतकरी मात्रे यांनी केला. शिवाय या महसूल प्रशासनाच्या अन्यायकारक भूमिकेमुळे त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. एकूणच अधिकारी पैशांची मागणी करीत असल्याने संतप्त होऊन मंगळवारी त्यांनी बदनापूर तहसील कार्यालयात तायडे यांच्या दालनातील टेबलवर पैशांची उधळण केली.
काय म्हणाले नायब तहसीलदार?
“मी स्वतःच्या स्वाक्षरीने रस्ता देण्याबाबत आदेश दिले होते. मात्र, विरोधी पक्षकाराने जालना येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे फेरयाचिका दाखल केली होती. त्यात मी दिलेला आदेश रद्द करून फेरचौकशीचा आदेश देण्यात आला. मी पैशांची मागणी केली असेल, तर त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार करावी. त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या टेबलवर नोटा टाकल्या आहेत,” असे नायब तहसीलदार हेमंत तायडे यांनी सांगितले.





