12 मित्रांचा अनोखा ग्रुप, तब्बल 2500 किमीचा प्रवास करत जाणार वैष्णोदेवी, 3 वर्षांपासून करतायत यात्रा, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
तब्बल 2500 किमीचा प्रवास करत शहरातील तरुण जम्मू काश्मीरातील माता वैष्णोदेवीला सायकलवर निघाले आहेत.
जालना : प्रत्येकजण आयुष्यात काहीतरी वेगळं, हटके करण्याचा प्रयत्न करतात. जालन्यातील 12 तरुणांनी देखील असंच साहसी पाऊल उचलले आहे. तब्बल 2500 किमीचा प्रवास करत शहरातील तरुण जम्मू काश्मीरातील माता वैष्णोदेवीला सायकलवर निघाले आहेत. कडाक्याच्या थंडीत सायकलवर प्रवास करत जाणे सोपी गोष्ट नक्कीच नाही. त्यांच्या या प्रवासाविषयी पाहुयात.
दीपेश भुरेवाल आणि त्यांचे 11 सहकारी मित्र मागील तीन वर्षांपासून ही यात्रा करत आहेत. गाडीने किंवा रेल्वेने प्रवास करण्याऐवजी त्यांनी सायकल निवडली. सायकलवर प्रवास करताना जास्त आनंद मिळतो. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देता येतात आणि पैशांची बचत होते त्याचबरोबर शरीर देखील तंदुरुस्त राहते. त्यामुळे आम्ही हा प्रवास करत असल्याचे भुरेवाल यांनी सांगितलं.
advertisement
हे 12 तरुण दररोज 100 किमी प्रवास करणार आहेत. सुरुवातीला राजस्थानमधील बाबा खाटूशाम इथे जाणार असून त्यानंतर हे तरुण माता वैष्णोदेवीसाठी रवाना होतील. या संपूर्ण प्रवासात त्यांना सायकलसह 30 हजार रुपये खर्च येणार आहे. रात्री ते वेगवेगळ्या मंदिरात मुक्काम करतील. दररोज 500 रुपये खर्च येईल. तर सायकलचा खर्च 10 ते 12 हजार रुपये असल्याचे दिनेश भुरेवाल याने सांगितले.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
December 11, 2025 3:00 PM IST
मराठी बातम्या/जालना/
12 मित्रांचा अनोखा ग्रुप, तब्बल 2500 किमीचा प्रवास करत जाणार वैष्णोदेवी, 3 वर्षांपासून करतायत यात्रा, Video








