TRENDING:

Breast Cancer : आईला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर मुलीलाही होतो का? पुण्यातील कर्करोग तज्ज्ञांनी सांगितला किती धोका

Last Updated:

Breast Cancer Causes : स्तनाच्या कर्करोगासाठी सर्वात जोखीम घटकांपैकी एक म्हणजे अनुवांशिक घटक असल्याचं सांगितलं जातं. BRCA1 आणि BRCA2 जनुकांमधील उत्परिवर्तनमुळे कर्करोगाचा धोका 65-85% पर्यंत वाढतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : असे काही आजार आहेत जे आनुवंशिक आहेत. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीलाही हे आजार होतात. अनेकांना ब्रेस्ट कॅन्सरही तसाच आजार वाटतो. म्हणजे आईला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर मुलीलाही होतो असं अनेकांना वाटतं. ब्रेस्ट कॅन्सरबाबतची ही भीती अनेकांच्या मनात आहे. पण ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या आईमुळे तिच्या मुलीला ब्रेस्ट कॅन्सर होण्याचा धोका किती आहे हे पुण्यातील डॉक्टरांनी सांगितलं आहे.
News18
News18
advertisement

जगभरातील महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा आजार आहे. या आजाराने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. जगातील वैज्ञानिक या रोगाच्या कारणांचा अभ्यास करत आहे. कर्करोगाला कारणीभूत असलेल्या पर्यावरणीय, अनुवांशिक जीवनशैली घटकांवर लक्ष केंद्रीत केलं जात आहे.

स्तनाच्या कर्करोगासाठी सर्वात जोखीम घटकांपैकी एक म्हणजे अनुवांशिक घटक असल्याचं सांगितलं जातं. BRCA1 आणि BRCA2 जनुकांमधील उत्परिवर्तनमुळे कर्करोगाचा धोका 65-85% पर्यंत वाढतो आहे. स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या स्त्रियांनाही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.

advertisement

Heart Attack : फक्त चालून हार्ट अटॅक रोखू शकतो, कसं आणि किती चालायचं? चंद्रपूरच्या डॉक्टरांनी सांगितलं

असं असेल तर मग आईमुळे मुलीला कॅन्सर होण्याचा धोका खरंच आहे का? याबाबत पुण्यातील ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मानसी गिरमे यांनी सांगितलं आहे.

डॉ. मानसी म्हणाल्या,  ब्रेस्ट कॅन्सरची सरासरी प्रकरणं पाहिली तर 100 पैकी 85 म्हणजे 85 टक्के प्रकरणं आनुवंशिकरित्या नाहीत. पण 15 टक्के प्रकरणं आनुवंशिकरित्या असू शकतात. आता आनुवंशिकरित्या कॅन्सर होण्याचा धोका कुणाला आहे तर वडिलांच्या कुटुंबात कुणाला ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तरी होऊ शकतो. त्यामुळे आईला ब्रेस्ट कॅन्सर असेल तरच मुलीला होईल असं नाही. वडिलांकडील कुटुंबातही कुणाला कॅन्सर असेल तर त्याचा धोका त्या मुलीला आहे.

advertisement

काय! पुरुषांनाही येतो मेनोपॉज, पण कसा, लक्षणं काय? चेन्नईच्या डॉक्टरांनी सांगितलं

त्यामुळे कुटुंबात कुणालाही कॅन्सर झाला असेल तर त्या कुटुंबातील सदस्यांनी कॅन्सरची टेस्ट करून घ्यावी, असा सल्ला डॉ. मानसी यांनी दिला आहे.

ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं

स्तनाच्या ठिकाणी एका बाजूला गाठ हे कॅन्सरचं मुख्य लक्षण आहे.

स्तनामध्ये वेदना न होणारी गाठ आढळणं

advertisement

स्तनाचा आकार बदलणं

निप्पलवर/आजूबाजूला लालसरपणा किंवा पुरळ येणं.

स्तन किंवा काखेत सतत वेदना,

उलटे स्तनाग्र किंवा त्याच्या आकारात बदल,

स्तन जागेवर ओलसरपणा किंवा इरिटेशन होणं

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुळाची झाली भाव वाढ, केळी आणि आल्याची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

स्तन नेहमी दिसतात त्यापेक्षा वेगळे दिसत असतील त्यामध्ये काही बदल झाला असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांनी मॅमोग्राम टेस्ट करावी.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Breast Cancer : आईला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर मुलीलाही होतो का? पुण्यातील कर्करोग तज्ज्ञांनी सांगितला किती धोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल