लोणच्याबद्दल एक गोष्ट अनेकदा ऐकायला मिळते ती म्हणजे जास्त लोणचं खाऊ नका, नाहीतर स्तनांचा आकार वाढेल लोणचं आणि स्तनांच्या आकारात खरोखर काही संबंध आहे का? की ही फक्त पिढ्यानपिढ्या चालत आलेली जुनी गोष्ट आहे? चला जाणून घेऊया यामागील सत्य काय आहे.
वायग्राचा बाप आहे शिलाजीत! फक्त ताकदच वाढत नाही तर महिला-पुरुषांना 'हे' फायदेही होतात
advertisement
लोणच्यामध्ये सहसा भरपूर सोडियम किंवा मीठ असतं. जास्त सोडियम सेवन केल्याने शरीरात पाणी साचतं, ज्याला वॉटर रिटेन्शन म्हणतात. यामुळे शरीर थोडं सुजलेलं दिसू शकतं आणि वजनही काही प्रमाणात वाढू शकतं. पण हे वजन चरबीमुळे वाढत नाही, तर पाण्यामुळे वाढते. जेव्हा शरीराचं वजन वाढतं तेव्हा कधीकधी स्तनाच्या आकारातही थोडासा बदल होऊ शकतो. पण त्याचा थेट संबंध लोणच्याशी जोडणं पूर्णपणे चुकीचं आहे.
तज्ज्ञांच्या मते, स्तनांचा आकार प्रामुख्याने अनुवंशशास्त्र आणि हार्मोनल बदलांवर अवलंबून असतो. कोणत्याही महिलेच्या स्तनाचा विकास तिच्या शरीरात असलेल्या इस्ट्रोजेन हार्मोनमुळे होतो. तथापि, आहार आणि जीवनशैली देखील स्तनांच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. पण लोणचं खाल्ल्याने स्तनांचा आकार वाढतो असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही.
Heart Attack : काही दुखलं की घेताय औषधं, येऊ शकतो हार्ट अटॅक
कोबी, फुलकोबी, लसूण इत्यादी काही भाज्यांमध्ये नैसर्गिक इस्ट्रोजेनचा प्रभाव असलेली खनिजं असतात. अशा परिस्थितीत जर या भाज्यांपासून बनवलेलं लोणचं नियमितपणे मोठ्या प्रमाणात खाल्लं तर त्याचा शरीराच्या हार्मोनल संतुलनावर परिणाम होऊ शकतो. याशिवाय जर आपण त्याबद्दल बोललो तर प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही जास्त लोणचं खाल्लं तर ते वजन वाढण्याचं कारणदेखील बनू शकतं. वजन वाढण्यासोबतच त्याचा स्तनाच्या चरबीवरही परिणाम होऊ शकतो.